शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपा कटिबद्ध - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 17:08 IST

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाचे फोटो शेअर करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई : राज्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण (OBC Reservation) रद्द झाल्याने बुधवारी राज्यभरात भाजपाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाचे फोटो शेअर करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या विश्वासघाताच्या विरोधात भाजपाच्यावतीने आज राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने नेते-कार्यकर्ते यात सहभागी झाले आणि राज्य सरकारचा तीव्र निषेध केला, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, या जागांवर भाजपा यशापयशाची पर्वा न करता केवळ आणि केवळ ओबीसी समाजाचेच उमेदवार देईल, अशी घोषणा आम्ही यापूर्वीच केली आहे. ओबीसी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपातर्फे राज्यभरातल्या विविध ठिकाणी आंदोलन छेडण्यात आले आहे. नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक याठिकाणी भाजपा आक्रमक झालेले दिसून आले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नागपुरात आंदोलन करणारे भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 

नागपूरच्या मानेवाडा चौकात चंद्रशेखर बावनकुळे आणि शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न भाजपा नेत्यांनी केला. तसेच,  पोलिसी बळाचा वापर करुन ओबीसी आरक्षणासाठीचे आंदोलन चिरडले जात असल्याचा आरोपही भाजपा आंदोलनकर्त्यांनी केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसOBC Reservationओबीसी आरक्षणBJPभाजपा