शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
4
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
5
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
6
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
7
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
8
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
9
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
10
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
11
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
12
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
13
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
14
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
15
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
16
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
17
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
18
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
19
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
20
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

Maharashtra Politics: “भाजपची साथ सोडल्यावर उद्धव ठाकरेंच्या अधःपतनाला सुरुवात, सत्तेसाठी ओवेसींसोबतही जातील”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 15:28 IST

Maharashtra News: ठाकरे गटातील कार्यकर्तेही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत केलेल्या युतीमुळे नाराज आहेत, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

Maharashtra Politics: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा अखेर करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती होत असल्याचे जाहीर केले. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेते या युतीवरून ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले आहे. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली त्याचवेळी त्यांचे अधःपतन झाले. बाळासाहेबांच्या नावाने मते घेतली,मात्र अडीच वर्षात तैलचित्र लावलं नाही, त्यांची संकुचित वृत्ती आहे. शिवसेनेची स्थापना करताना बाळासाहेबांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. काँग्रेसकडून वारंवार सावरकर यांचा अपमान करण्यात येत आहे. मात्र उद्धव ठाकरे सावरकरांचा अपमान करणाऱ्या सोबत जाऊन बसले. अडीच वर्ष तुम्ही सत्तेचा उपभोगही घेतला, अशी टीका बावनकुळे यांनी केली. 

उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात यायला हवे होते   

सत्ता भोगत असताना उद्धव ठाकरे यांनी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावले नाही. त्यांनी फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भावनिक  साद घालून मते मिळविली. त्यांनी विधिमंडळात यायला हवे होते, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, आम्ही लढत असलेल्या चारही जागा आम्ही जिंकू. कोकणात आम्ही मुसंडी मारली आहे. तर मराठवाडा, अमरावती आणि नागपूर येथे चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिकची जागा अपक्ष उमेदवारांची आहे. नाशिकबद्दल पक्षस्तरावर अद्याप निर्णय झालेला नाही. तसेच कॉंग्रेसमधून निलंबित सत्यजित तांबे  यांनी भाजपकडे अजूनही समर्थन मागितलेले नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांची सत्ता गेल्यापासून ते अस्वस्थ आहे. सत्तेसाठी ते ओवेसी यांच्यासोबतही युती करण्यास तयार होतील. ठाकरे गटाने प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतला. त्याचा काही फायदाही त्यांना होणार नाही. उद्धव ठाकरेंसोबतचे कार्यकर्तेही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत केलेल्या युतीमुळे नाराज आहेत. अनेक कार्यकर्ते येत्या काळात ठाकरेंची साथ सोडतील, असा दावा बावनकुळेंनी केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरे