शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सेनेने राखले बालेकिल्ले

By admin | Updated: February 24, 2017 08:17 IST

उत्तर पूर्व मुंबईत शिवसेना भाजपाने गड राखल्याने

मुंबई : उत्तर पूर्व मुंबईत शिवसेना भाजपाने गड राखल्याने, दोघांमध्ये चुरशीची लढत बघायला मिळाली. एकूण ३९ प्रभागांपैकी शिवसेनेच्या १३ तर भाजपाच्या १२ उमेदवारांनी बाजी मारली. मनसे, काँग्रेस राष्ट्रवादीचाही प्रभाव कमी झाला़ मानखुर्द शिवाजीनगरमध्ये समाजवादी पक्षाने पाच जागांवर आपला ठसा उमटवला. उत्तर पूर्व मुंबईत खासदार किरीट सोमय्या यांनी मुलुंडमध्ये पुत्र नील, तसेच शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपात प्रवेश केलेल्या प्रभाकर शिंदेला उमेदवारी दिल्याने, भाजपा आमदार सरदार तारासिंग यांची नाराजी ओढावून घेतली होती. त्यामुळे मुलुंडमध्ये भाजपाच्या पाच उमेदवारांच्या विरुद्ध भाजपाचे अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले होते. मुलुंड भाजपा आमदार सरदार तारासिंग यांनी सलग २० वर्षे मुलुंडमध्ये भाजपाचा गड राखवून ठेवला होता. त्यांच्याच उमेदवारांना संधी दिली नाही. दोघांमधील वाद वरिष्ठांपर्यंत पोहोचल्याने तारासिंगही प्रचारात उतरले. त्याचाही फायदा भाजपा उमेदवारांना झाला. भाजपाने घवघवीत मतांनी राष्ट्रवादीचे नंदकुमार वैती मनसेच्या सुजाता पाठक यांचा पत्ता साप करत, सहाच्या सहा जागांवर शिक्कामोर्तब केले. भांडुपमधील शिवसेनेच्या उमेदवारांनी सेनेचा बालेकिल्ला राखून ठेवला. सेनेच्या गडात सर्वांचे ‘भाई’ म्हणून ओळख असलेले रमेश कोरगावकर यांनी मनसेच्या नगरसेविका अनिषा माजगावकर यांना धोबीपिछाड देत चौथ्यांदा विजय मिळविला. प्रभाग क्रमांक ११५ मध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्याने राजकीय वातावरण तापले होते. याचाच फायदा शिवसेनेचे उपेंद्र सावंत यांना झाला. भाजपाचे जितेंद्र घाडीगावकर यांचा तब्बल तीन हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला. भांडुप पूर्वेकडे पालिका गटनेता धनंजय पिसाळ यांना धक्का बसला आहे. भाजपा नगरसेवक मंगेश पवार यांच्या पत्नी सारिका मंगेश पवार यांनी त्यांच्या पत्नीला धोबीपछाड देत विजय मिळविला आहे. एस वॉर्डमध्ये भांडुप राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय पाटील यांना राष्ट्रवादीच्या मनीषा रहाटे यांच्या एकाच सीटवर समाधान मानण्याची नामुष्की ओढावली. शिवसेना आमदार अशोक पाटील यांनी नगरसेवक पद आपल्याच पारड्यात ठेवण्याचे स्वप्न तूर्तास तरी काँग्रेस उमेदवार संजय पाटील यांची वहिनी प्रमिला पाटील यांच्या विजयामुळे धुळीत मिळाले आहे. या प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांच्या पत्नीचा पराजय झाला. विक्रोळीत कमी उंचीच्या मनसेच्या जयंत दांडेकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत, भाजपामध्ये आलेल्या आमदार मंगेश सांगळेना झोपविले. मात्र, अवघ्या २४० मतांनी दांडेकर यांना हार पत्करावी आहे. घाटकोपरमध्ये गुजराती व जैन लोकवस्ती अधिक आहेत. येथे भाजपा आमदार प्रकाश मेहता यांचे वर्चस्व अधिक आहे. तरीदेखील या भागात त्यांना भाजपाच्या दोन उमेदवारांवरच समाधान मानावे लागले. भाजपाच्या सर्वात श्रीमंत कोट्यधीश उमेदवारांपुढे काँग्रेस आमदार प्रवीण छेडा यांना हार पत्कारावी लागली. (प्रतिनिधी)शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने घाटकोपरमधून बंडखोरी करत, अपक्ष उभ्या राहिलेल्या सुधीर मोरेच्या वहिनीने विजय मिळवल्याने सेनेला धक्का बसला. मानखुर्द शिवाजीनगरमध्ये समाजवादी पक्षाने पाच जागांवर ठसा उमटविला आहे. एकूणच उत्तर पूर्व मुंबईत शिवसेना १३, भाजपा १२, राष्ट्रवादी ३, काँग्रेस ३, समाजवादी ५, मनसे २ आणि एक अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे.