शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

भाजपाने हिंदुत्वाशी नाते तोडले !

By admin | Updated: October 6, 2014 04:49 IST

हिंदुत्वाच्या विचारावर झालेली व २५ वर्षांपासूनची युती तोडून भाजपाने हिंदुत्वाशी असलेले नातेही तोडले. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणतात ते यालाच

नागपूर : हिंदुत्वाच्या विचारावर झालेली व २५ वर्षांपासूनची युती तोडून भाजपाने हिंदुत्वाशी असलेले नातेही तोडले. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणतात ते यालाच, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कर्मभूमीत केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गड असलेल्या रेशीमबागेतील स्मृती मंदिराजवळील मैदानावर रविवारी शिवसेनेची प्रचारसभा झाली. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी ‘माझ्या तमाम हिंदू बांधवानो’असे उपस्थितांना आवाहन करीत थेट हिंदुत्वाच्या मुद्याला हात घातला. याच मैदानावर शुक्रवारी संघाचा दसरा महोत्सवाचा कार्यक्रम झाला. व्यासपीठाची जागाही तीच आहे. व्यासपीठ हिंदू विचाराचे आहे. पंचवीस वर्षांपूर्वी हिंदुत्वाच्याच विचारावर युती झाली होती. मात्र भाजपाने युती तोडून हिंदुत्वाशी नाते तोडले. त्यांनी असे का केले याचा जाब त्यांना महाराष्ट्राला द्यावा लागेल, असे ठाकरे म्हणाले. लोकसभा निवडणुकीत आम्ही सोबत होतो. दिल्ली आम्ही जिंकली, विधानसभा निवडणुकीतही राज्यातील जनता युतीकडे सत्ता सोपवण्यासाठी उत्सुक होती. पण भाजपाला ते नको होते. भाजपासाठी आम्ही छातीवर वार झेलले. बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा खुद्द शिवसेनाप्रमुखांनी ‘हो आम्ही मशीद पाडली’ असे जाहीरपणे सांगितले होते. अमरनाथ यात्रेच्या वेळीही आम्हीच हिंदूंसाठी आवाज उठविला. एवढेच नव्हे तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेव्हा हिंदूराष्ट्राची संकल्पना मांडली तेव्हा त्याला समर्थन देणारी शिवसेनाच होती. शरद पवार यांनी जेव्हा संघावर टीका केली त्यालाही उत्तर शिवसेनेनेच दिले होते. भाजपासाठी आम्ही अनेक वेळा त्याग केला. इतर राज्यात आम्ही उमेदवार उभे केले नाही. पण भाजपाने पाठित खंजीर खुपसला, अशी टीका उद्धव यांनी केली. दिल्लीत तुम्ही (भाजपा) असताना महाराष्ट्रात आम्हाला त्रास का देता, असा सवाल त्यांनी केला. (प्रतिनिधी)