शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

भाजपचा धमाका

By admin | Updated: October 20, 2014 00:43 IST

विधानसभा निवडणुकीत उपराजधानी पूर्णपणे भाजपमय झाली. मतदारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत एकतर्फी कौल दिला.

११ जागा जिंकल्या - शहरात ‘सुपर सिक्सर’ नागपूर : विधानसभा निवडणुकीत उपराजधानी पूर्णपणे भाजपमय झाली. मतदारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत एकतर्फी कौल दिला. शहरातील सहाही तर ग्रामीणमधील सावनेर वगळता पाच, अशा एकूण ११ जागा भाजपने जिंकल्या. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपची ११ आमदारांची टीम विधानसभेत पोहचली. स्वतंत्रपणे लढलेल्या राष्ट्रवादीची सर्वच जागांवर टीक टीक बंद पडली तर शिवसेनेचा धनुष्यही ताणला गेला नाही. उत्तर नागपुरात बसपाचा हत्ती जोरात धावला पण शर्यत जिंकू शकला नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व काँग्रेसचे आ. सुनील केदार यांनी विजयाचा चौकार तर भाजपचे आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘हॅट्ट्रिक’ केली. काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत, अनिस अहमद, सतीश चतुर्वेदी यांच्यासह काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे तर ग्रामीणमध्ये माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, सुबोध मोहिते, राजेंद्र मुळक यांच्यासह शिवसेनेचे आ. आशिष जैस्वाल या दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, आशिष देशमुख, डी. मल्लिकार्जुन रेड्डी व समीर मेघे हे पाच नवे चेहरे ‘जायंट किलर’ ठरले. सुधाकर देशमुख (पश्चिम), कृष्णा खोपडे (पूर्व), विकास कुंभारे (मध्य) व सुधीर पारवे (उमरेड) या भाजपच्या चारही आमदारांनी एकतर्फी सामना जिंकत पुन्हा विधानसभेचा मार्ग सुकर केला तर, सावनेरमध्ये आ. सुनील केदार यांच्या विजयामुळे काँग्रेसला जिल्ह्यात खाते उघडता आले. उत्तर नागपुरातून वेळेवर भाजपने ऐनवेळी तिकीट दिलेले डॉ. मिलिंद माने यांनी नितीन राऊत यांचा गड उद्ध्वस्त केला. १३ हजार ७१८ मतांनी माने विजयी झाले. विशेष म्हणजे येथे बसपाचा हत्ती काँग्रेसपेक्षा जोरात धावला. बसपाकडून लढलेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी तब्बल ५५ हजार १७८ मते घेतल्यामुळे राऊत यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला. गजभिये दुसऱ्या क्रमांकावर राहिले पण त्यांच्यामुळे माने यांचा विजयपथ सुकर झाला. असाच चमत्कार दक्षिणमध्ये घडला. भाजपचे नगरसेवक सुधाकर कोहळे यांनी काँग्रेसचे सतीश चतुर्वेदी यांना ४३ हजार २१४ मतांनी एकतर्फी नमविले. चतुर्वेदी पूर्व नागपूरचा मतदारसंघ सोडून दक्षिणमध्ये आले होते. पण कोहळे यांनी त्यांना तेथेही बस्तान मांडू दिले नाही. राष्ट्रवादीकडून लढलेले माजी आ. दीनानाथ पडोळे तर सहाव्या क्रमांकावर घसरले. बसपाच्या सत्यभामा लोखंडे यांनी तब्बल २३ हजार १५६ मते घेतली. मध्य नागपुरात परतलेले काँग्रेसचे अनिस अहमद यांना या वेळीही विधानसभेचा मध्यम मार्ग गवसला नाही. भाजपचे आ. विकास कुंभारे यांनी त्यांना ३८ हजार ७१ मतांनी पराभूत केले. पश्चिम नागपुरात विकास ठाकरे यांना काँग्रेसची घडी बसविता आली नाही. काटोलमध्ये काका- पुतण्याच्या लढाईत पुतण्याने बाजी मारली. राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख यांना भाजपचे आशिष देशमुख यांनी अटीतटीच्या लढतीत ५ हजार ५५७ मतांनी पराभूत केले. येथे शिवसेनेचा बाण सुटलाच नाही. माजी खा. दत्ता मेघे यांचे पुत्र समीर मेघे यांच्यासाठी विविध मतदारसंघाची चाचपणी केल्यानंतर त्यांना हिंगण्यातून उमेदवारी देण्यात आली. भाजपचा हा निर्णयही योग्य राहीला. राष्ट्रवादीचे माजी मंत्री रमेश बंग यांचा त्यांनी २३ हजार १५८ मतांनी पराभव केला. माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी कामठीत नशीब आजमावले. राजकीय खेळीत तरबेज असलेले मुळक हे भाजपचे आ. चंद्रशेखर बावनकुळेंना अडचणीत आणतील, असे वाटत होते. पण बावनकुळे यांच्या ‘नेटवर्क’ समोर त्यांचे ‘प्लॅनिंग’ फिके पडले. तब्बल ४० हजार २ मतांनी मुळक यांना पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादीतून ऐनवेळी भाजपमध्ये गेलेले डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी शिवसेनेचे आ. आशिष जैस्वाल यांना पराभूत करीत रामटेकच्या गडावर भाजपाचा भगवा फडकविला. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतलेली प्रचारसभाही माजी मंत्री सुबोध मोहिते यांना तारू शकली नाही. ते तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले. राष्ट्रवादीच्या दहा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले तर, सावनेरमध्ये भाजपच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे विनोद जीवतोडे यांनी ७५ हजारांचा पल्ला पार केला. मात्र, माजी खा. प्रकाश जाधव, किरण पांडव, राजू हरणे, तापेश्वर वैद्य, अजय दलाल हे शिवसैनिक विशेष कामगिरी बजावू शकले नाही. (प्रतिनिधी)