शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
2
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
3
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
4
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
5
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
6
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
7
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
8
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
9
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...
10
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
11
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
12
"मी आता थकलोय, मला मानसिक शांतता हवीय"; तरुणाने ९ दिवसांत सोडली १४ लाखांची नोकरी
13
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
14
Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!
15
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
16
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
17
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
18
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
19
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
20
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?

राज्यात भाजपा आता बॅकफूटवर

By admin | Updated: November 9, 2015 03:25 IST

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव स्वीकारावा लागल्याचे परिणाम महाराष्ट्रातील भाजपालादेखील सहन करावे लागू शकतात. भाजपा आम्हाला विश्वासात घेत नसल्याची राज्यातील त्यांच्या मित्रपक्षांची

यदु जोशी, मुंबईबिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव स्वीकारावा लागल्याचे परिणाम महाराष्ट्रातील भाजपालादेखील सहन करावे लागू शकतात. भाजपा आम्हाला विश्वासात घेत नसल्याची राज्यातील त्यांच्या मित्रपक्षांची तक्रार आता त्यांना गांभीर्याने घ्यावी लागेल, असे दिसते. मुंबई महापालिकेच्या सव्वा वर्षावर आलेल्या निवडणुकीत बिहारमधील नव्या सत्तासमीकरणांचा फटका भाजपाला बसून, काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे. भाजपा आणि शिवसेना सत्तेत एकत्र असले तरी गेल्या वर्षभरात दोघांनी विरोधक असल्याप्रमाणे एकमेकांवर टीका केली आहे. भाजपा आम्हाला सरकारमध्ये गृहीत धरते, अशी तक्रार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी वर्षपूर्तीच्या निमित्ताने केली होती. बिहारच्या निवडणुकीत भाजपाला निर्विवाद यश मिळाले असते तर मित्रपक्षांची फारशी चिंता न करता महाराष्ट्रातील कारभार हाकण्याकडे पक्षाचा कल राहिला असता. राजकीय जाणकारांच्या मते, आता भाजपाला तशी मनमानी करता येणार नाही. मुंबई महापालिकेची निवडणूक २०१७ च्या सुरुवातीला होणार आहे. बिहारी आणि हिंदी भाषकांची मोठी मतसंख्या मुंबईत आहे. बिहारमध्ये जदयू-राजद-काँग्रेस आघाडी जिंकली आहे आणि त्यातील केवळ काँग्रेसच मुंबई महापालिकेची निवडणूक लढते, हे लक्षात घेता बिहारमधील निकालांचा फायदा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला होऊ शकतो. मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम मूळ बिहारीच आहेत. मुंबईत मराठी भाषकांची मते मुख्यत्वे शिवसेनेला आणि गेल्या दोन निवडणुकांपासून मनसेकडेही जातात. हिंदी मतदारांचा कल मुख्यत्वे काँग्रेसकडे राहत आला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची भाजपाची खुमखुमी लपून राहिलेली नाही. युती न करता लढलो तर बिहारींसह हिंदी भाषकांची मते मोठ्या प्रमाणात मिळतील, असा भाजपाचा होरा असावा. मात्र आजच्या निकालाने त्याबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळेच भाजपाला आत्मचिंतन करावे लागू शकते. स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं, शिवसंग्राम आणि राष्ट्रीय समाज पक्ष या भाजपाच्या छोट्या मित्रपक्षांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करून त्यात संधी देण्याची सुरुवातीपासूनच मागणी केली आहे. विस्तार आणि महामंडळांवरील नियुक्त्या होत नसल्याबद्दल त्यांनी वेळोवेळी नाराजीदेखील व्यक्त केली आहे. बिहारमधील निकालाच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांकडून या दोन्हींबाबत भाजपावर दबाव वाढू शकतो. वेगवेगळ्या शासकीय समित्यांवर नियुक्त्यांबाबत ६०/४० चा फॉर्म्युला भाजपा-शिवसेनेच्या समन्वय समितीच्या बैठकीत ठरला होता; पण भाजपाचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्ये त्याला केराची टोपली दाखवून मनमानी केली जात असल्याची तक्रार याच आठवड्यात झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर केली होती. मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचे वेध भाजपाला लागले आहेत; मात्र आजच्या निकालाने ही व्होट बँक भाजपासोबत जाईल की नाही, याबाबत मोठी शंका निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील नेते प्रचारापासून दूरबिहारमधील प्रचारामध्ये महाराष्ट्रातील एकाही भाजपा नेत्याला पाठविण्यात आले नव्हते. भाजपा शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सत्तेत आहे. बिहारींमध्ये सेनेबद्दल राग असल्याने इकडचे नेते तिकडे गेले तर विपरीत परिणाम होईल, म्हणून महाराष्ट्रीय नेत्यांना पाठविले नव्हते.