शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

उमरखेडमध्ये इच्छुकांची गर्दी; भाजप नेतृत्वासमोर निर्माण होणार पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 15:04 IST

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वच पक्षात इच्छुकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रत्येक पक्षासमोर इच्छुकांची समज काढणे मोठे आव्हान ठरणार आहे.

मुंबई - अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. एकाच पक्षातून अनेकांनी तयारी सुरु केल्याने, सर्वच पक्षांची उमेदवारी देताना दमछाक होणार आहे. उमरखेड मतदारसंघात भाजपकडून उमेदवारीसाठी विद्यमान आमदार राजेंद्र नजरधने यांचे नाव निश्चित समजले जात आहे. मात्र असे असतानाही पक्षातील नेत्यांनी याच मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी मुंबई वाऱ्या सूर केल्याने नजरधनेंची डोकेदुखी वाढली असल्याची चर्चा आहे. तर इच्छुकांची मनधरणी करताना भाजप नेतृत्वासमोर पेच निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. 

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वच पक्षात इच्छुकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रत्येक पक्षासमोर इच्छुकांची समज काढणे मोठे आव्हान ठरणार आहे. उमरखेड मतदारसंघात तर भाजपमधील नेत्यांनी उमेदवारी मिळावी म्हणून थेट मुंबईत फिल्डिंग लावणे सुरु केले आहे. त्यामुळे विद्यामान आमदार यांची डोकेदुखी वाढली आहे.

उमरखेड मतदारसंघ युतीत भाजपकडे आहे. गेल्यावेळी आमदार राजेंद्र नजरधने यांनी काँग्रेसचे विजयराव खडसे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. यावेळी सुद्धा नजरधने यांची उमेदवारी निश्चित समजली जात होती. मात्र एनेवेळी आता यवतमाळ भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे आणि विश्वपाल धुळधुळे यांच्यासह अनेकांनी सुद्धा उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली सूर केल्याने, नजरधने यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

विदर्भातील कोणत्याही मतदारसंघात केवळ गडकरी वाड्याशी संबध असलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळवण्यात यश येत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे उमरखेड मधील भाजपच्या इच्छुकांनी या दृष्टीने हालचाली सूर केल्या आहेत. त्यामुळे यावेळी भाजपची उमेदवारी आमदार नजरधने यांच्याकडे कायम राहणार की, नवीन चेहरा भाजपकडून दिला जाणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.