शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

 भाजपाने जनतेचा कौल स्विकारला, पराभवाची कारणे शोधु - आ.चिखलीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 17:01 IST

नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला अपयश आले. हा पराभव स्विकारतानाच त्या मागील कारणेही  शोधु असे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देहा पराभव स्विकारतानाच त्या मागील कारणेही  शोधु भाजपाला यंदा २४ % मतांची वाढ मिळाली आहे. काँग्रेसने शहर विकासासाठी पुढाकार घ्यावा.

नांदेड, दि. १३ : नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला अपयश आले. हा पराभव स्विकारतानाच त्या मागील कारणेही  शोधु असे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.

नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपयश आल्या नंतर भाजपाच्या वतीने आज शहरातील ओम गार्डन येथे पत्रकार परिषदेत आ. चिखलीकर बोलत होते. यावेळी बहुजन विकास आघाडीचे सुरेश गायकवाड, भाजपा महानगराध्यक्ष संतुकराव हंबर्डे, पक्ष प्रवक्ते सुनील नेरलकर, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा आदींची उपस्थिती होती.

प्रारंभी महानगराध्यक्ष हंबर्डे म्हणाले की, आम्ही अपयशी झालो तरी विरोधकांना आम्ही सहज जिंकू दिले नाही. गेल्या मनपा निवड़णूकीपेक्षा भाजपाला यंदा २४ % मतांची वाढ मिळाली आहे. यावेळी बहुजन विकास अघाडीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश गायकवाड म्हणाले की, निवडणूक भाजपाने ताकदीने लढली मात्र यश मिळाले नाही.  जनतेचा कौल खुल्या अंतकरणांने स्वीकारत असून भविष्यात काँग्रेसवर बाहेरून नजर ठेवून विकासकामांसाठी पाठपुरावा करू.  यापुढे भाजपा सोबतच राहू असा शब्दही गायकवाड यांनी दिला.

पराभवाचे कारण शोधू यानंतर आ.चिखलीकर म्हणाले की, मागील  १९ वर्षात शहराचा अपेक्षित विकास झालेला नाही. त्यानंतरही  जनतेने सत्ता दिली. त्यामुळे आता तरी काँग्रेसने शहर विकासासाठी पुढाकार घ्यावा. पराभवाची कारणे शोधून काढु, आमचे अपयश म्हणजे जनतेने आमचा जाहिरनामा नामुंजर  केल्याची कबुलीही चिखलीकरांनी दिली. केंद्र तथा राज्याकडुन भेटणाऱ्या निधीत शहराचा विकास असतो त्यात मी आडकाठी घालणार नसल्याचे ते म्हणाले. लातूर नांदेड आणि जुने नवे हा वाद नव्हता तर तो जाणिवपूर्वक तयार करण्यात आला होता असेही त्यांनी यावेळी सांगितले

टॅग्स :BJPभाजपा