शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

भाजप : १४ टक्के मतांच्या वाढीवर ७६ जागा पदरात; काँग्रेस : ४ टक्के मते घटली अन् ४० जागा गमावल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 05:07 IST

विधानसभा निवडणूक २०१४ : शिवसेनेच्या १९ जागांत वाढ, तर राष्ट्रवादीचे २१ जागांवर पाणी

नंदकिशोर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या मोदींच्या त्सुनामिमुळे देशभरात काँग्रेस पक्षाची वाताहात झाली, परंतु सर्वाधिक नुकसान महाराष्ट्रात झाले. राज्यातील काँग्रेस खासदारांची संख्या १७ वरून थेट दोनवर आली. शिवाय, सलग पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या या पक्षाला पायउतार व्हावे लागले. एखाद्या राजकीय लाटेत मतांची टक्केवारी आणि जागांचे गणित कसे बिघडून जाते, ते २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून आले.

सार्वत्रिक निवडणुकीचे गणित नेहमीच सरासरी मतांवर अवलंबून असते असे नाही. महाराष्ट्रातील मागील दोन विधानसभा (२००९-२०१४) निवडणुकीतील पक्षनिहाय मिळालेली मते आणि जागांचे विश्लेषण केले असता निवडणूक आकडेवारी शास्त्राला (शेफॉलॉजी) अभिप्रेत नसलेले निष्कर्ष हाती लागतात. २००९ च्या तुलनेत काँग्रेस पक्षाला अवघी ३.६ टक्के मते कमी पडली; मात्र एवढ्याशा घटीने या पक्षाला तब्बल ४० जागा गमावाव्या लागल्या. या उलट शिवसेनेच्या मतांत २ टक्क्यांची घट होऊनही या पक्षाला १९ जागांचा फायदा झाला. विशेष म्हणजे २०१४ साली भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी हे चारही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढले होते.

युती न करता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय भाजप-सेनेच्या पथ्यावर पडला. तसा आघाडी न करण्याचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादीला बसला. असे का झाले, याची काही कारणं आहेत. एक, केंद्रातील मोदी सरकारचा फायदा भाजपला झाला. दोन, २००९ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने शिवसेनेच्या मतांवर मोठा डल्ला मारला होता; तो ‘राज’करिश्मा २०१४ च्या निवडणुकीत दिसून आला नाही. परिणामी, सेनेची व्होट बँक शाबुत राहिली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला मुंबईतील तब्बल १९ जागांवर पाणी सोडावे लागले.विदर्भाने दिली भाजपला साथआजवर काँग्रेसच्या पाठिशी राहाणाऱ्या विदर्भाने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकमुखी साथ दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत विदर्भाने भाजपच्या पदरात ४३ जागा दिल्या. २००९ च्या तुलनेत तब्बल ३४ जागांची वाढ झाली. या उलट काँग्रेस पक्षाने विदर्भातील १४ तर राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागा गमावल्या. शिवसेनेलाही ३ जागांवर पाणी सोेडावे लागले.
मुंबईत सेनाच मोठा भाऊ!मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचे भाजपचे स्वप्न शिवसेनेने धुळीला मिळवले, शिवाय मुंबई, ठाणे आणि कोकणात २८ जागा जिंकून कोकण किनारपट्टीत आणि मायानगरीत आपणच मोठा भाऊ असल्याचे २०१४च्या विधानसभा निवडणुकीत सिद्ध करून दाखवले. भाजपला २४ जागा मिळाल्या. मात्र, कोकणात त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. या उलट काँग्रेस (१४) आणि राष्टÑवादीला (५) या विभागातील १९ जागांवर पाणी सोडावे लागले.प. महाराष्ट्रात राष्ट्रवादीची हारराष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात गत विधानसभा निवडणुकीत दाणादाण उडाली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, विजयसिंह मोहिते-पाटील (भाजपमध्ये जाण्यापूर्वी) असे दिग्गज नेते असतानाही राष्टÑवादी काँग्रेस २४ जागांवरून १९ जागांवर आला. बारामतीला लागून असलेल्या दौंड मतदारसंघात रासपचे राहुल कुल निवडून आले. याच आ. कुल यांच्या पत्नी रंजना कुल यांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना आव्हान दिले होते.