शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
2
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
3
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
4
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
5
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
6
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
7
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
9
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
10
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
11
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
12
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
13
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
14
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
15
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
16
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
17
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
18
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
19
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
20
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत

वाशिम जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ!

By admin | Updated: May 4, 2017 01:34 IST

‘बेटी बचाओ’ची शपथ : लिंगगुणोत्तर पोहोचले ९०६ वर

सुनील काकडे - वाशिम‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ सारख्या उपक्रमांना जिल्ह्यात यश मिळत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. यावर्षी मुलींच्या जन्मदरात ४३ ने वाढ झाली आहे. दरम्यान १ मे रोजी आयोजीत ग्रामसभेत ग्रामपंचायतींनी बेटी बचाओ अभियान आणखी जोमात राबविण्याचा निर्धार केला आहे.महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने मुलींचा जन्मदर वाढावा, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. त्यानुषंगाने राज्यातील बीड, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, औरंगाबाद, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, जालना आणि वाशिम या दहा जिल्ह्यांमध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान राबविले जात आहे. वाशिम जिल्ह्यात बेटी बचाओ अभियानाला काहीसे यश आले असून यावर्षी मुलींचा जन्मदर ४३ ने वाढून प्रत्येक हजार मुलांमागे ९०६ वर पोहचला आहे. गतवर्षी हा जन्मदर ८६३ असा होता. १ मे रोजी झालेल्या ग्रामसभांमध्ये ग्रामपंचायतींनी बेटी बचाओ अभियान आणखी गतीमान करण्याचा निर्धार केला आहे. या ग्रामसभेला उपस्थित महिला-पुरूषांनी याबाबत शपथ घेतली.‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’अभियान तसेच इतर महत्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आले असून त्याचा हा सकारात्मक परिणाम आहे. सन २०११ मधील लोकसंख्येवर आधारित सन २०१५ मध्ये वाशिममध्ये प्रती हजार मुलांमागे मुलींच्या जन्माचे प्रमाण ८६३ होते, ते २०१७ मध्ये ९०६ वर पोहचले आहे. मात्र, एवढ्यावरच समाधान न मानता हे लिंगगुणोत्तर हजार करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे.- योगेश जवादे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण, जि.प., वाशिम