शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

पक्षी ठरले दिवाळीच्या फटाक्यांचे बळी

By admin | Updated: November 15, 2015 02:18 IST

प्रकाशाचा उत्सव असलेल्या दीपावलीत फटाक्यांमुळे हवा व ध्वनिप्रदूषणाबरोबरच पक्ष्यांनाही अपाय होतो. यंदाही दिवाळीत आतषबाजीमुळे शेकडो पक्ष्यांना जीव गमवावा लागल्याचे

अझहर शेख,  नाशिकप्रकाशाचा उत्सव असलेल्या दीपावलीत फटाक्यांमुळे हवा व ध्वनिप्रदूषणाबरोबरच पक्ष्यांनाही अपाय होतो. यंदाही दिवाळीत आतषबाजीमुळे शेकडो पक्ष्यांना जीव गमवावा लागल्याचे पर्यावरणप्रेमींच्या निरीक्षणातून समोर आले आहे. सण-उत्सव साजरे करताना सजीवसृष्टीला अपायकारक ठरणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यातूनच अनेक पर्यावरणप्रेमींनी मकर संक्रांतीच्या वेळी पतंगोत्सवासाठी नायलॉन बंदीसाठी विविध स्तरांवर केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. तरीही छुप्या पद्धतीने वापरण्यात येणाऱ्या मांज्यामुळे पक्षी जायबंदी होतात. आताही दिवाळीत फटाक्यांच्या धूमधडाक्यामुळे पक्ष्यांना अपाय होतात. दीपावलीचा उत्सव सुरू झाला की, फटाक्यांचे आवाज आणि त्याद्वारे होणारे वायुप्रदूषण पक्ष्यांच्या जीवावर बेतणारे ठरते. पक्ष्यांचा अधिवास असलेल्या झाडांच्या परिसरात अचानकपणे फटाके फुटू लागताच, पक्षी बिथरतात आणि घबराटीने काही मृत्युमुखी पडतात. काही आवाजापासून लांब जाण्यासाठी रात्रीच्या अंधाराची पर्वा न करता भरारी घेतात. मात्र, त्यांची ही भरारीदेखील जीवघेणी ठरते. अडथळ्यांवर आपटून पक्षी जमिनीवर कोसळतात. दरवर्षी दिवाळीच्या काळात मोठ्या संख्येने पक्षी बेघर होतात. क्षणभराचा फटाक्यांचा आनंद अनेक पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरतो. नाशिकमध्ये अनेक संस्था व पक्षीप्रेमींनी सोशल मीडियाबरोबरच फटाक्यांच्या विरोधात व्यापक मोहीम सुरू केली आहे. वाढती मानवी वस्ती व शाश्वत विकास संकल्पना अंमलात न आणता केली जाणारी विकासकामे, यामुळे पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास शहर परिसरातून जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. वड, पिंपळ, नांद्रुक, करंज, उंबर, कडुनिंब, चिंच यांसारखे पर्यावरणपूरक व जैवविविधता जोपासणारे आणि अन्न, निवारा या गरजा भागविणाऱ्या वृक्षांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. त्यामुळे पक्ष्यांचे अस्तित्वही धोक्यात येत आहे. त्यातच सण-उत्सवांचे बदलते स्वरूप पक्ष्यांच्या मुळावर आले आहे.तीन दिवसांपूर्वीच जखमी अवस्थेतील कोकिळेला सोडविण्यात आले. धनत्रयोदशीपासून तुलसी विवाहापर्यंत जखमी पक्ष्यांच्या ‘रेस्क्यू’चे कॉल दिवाळीमध्ये दरवर्षी येतात. फटाक्यांमुळे पक्षी व पर्यावरणाची अपरिमित हानी होते.- शेखर गायकवाड, पक्षिमित्र