शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

Bipin Rawat: 'ती' भेट अखेरची ठरली! २४ दिवसांपूर्वी ‘सीडीएस’ बिपिन रावत यांचे नागपुरात ‘सॅल्यूट’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 05:53 IST

वायुसेनेच्या मेन्टेनन्स कमांडला भेट : विभागाच्या आत्मनिर्भरतेबाबत काढले होते गौरवोद्गार

नागपूर : ‘सीडीएस’ जनरल बिपिन रावत... ओतप्रोत भरलेले देशप्रेम, राष्ट्रसुरक्षेप्रति सदैव सजग, तीनही संरक्षण दलाची इत्थंभूत माहिती, करारी आवाज अन् भेदक नजर. त्यांचे नाव घेताच ‘डिफेन्स’मधील प्रत्येक अधिकारी-जवानाची छाती गर्वाने भरून येत होती. देशाला सर्वोच्च प्राधान्य देणारे रावत हे २४ दिवसांपूर्वी नागपूरच्या भूमीवर होते. तीन आठवड्यांतच देशाच्या सर्वोच्च अधिकाऱ्याचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यामुळे येथील अधिकारी व जवानांना धक्का बसला आहे. रावत यांना काही दिवसांपूर्वी केलेले ‘सॅल्यूट’ अखेरचे ठरेल, याची त्यांनी स्वप्नातदेखील कल्पना केली नव्हती.

१५ नोव्हेंबर रोजी ‘सीडीएस’ जनरल बिपिन रावत यांनी भारतीय वायुसेनेच्या नागपुरातील मेन्टेनन्स कमांडला भेट दिली होती. त्याच दिवशी नागपुरातील अधिकाऱ्यांनी कडक ‘सॅल्यूट’ ठोकले होते. रावत यांनीदेखील त्याच जोशाने भाषण करत वायुदलाच्या आत्मनिर्भरतेबाबत गौरवोद्गार काढले होते. मेन्टेनन्स कमांड हा भारतीय वायुसेनेचा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे. वायुसेनेच्या अमूल्य संपत्तीची देखभाल करण्याची महत्त्वाची जबाबदारी या विभागावर आहे. हा विभाग वेगात आत्मनिर्भर होत आहे. मेन्टेनन्स कमांड आत्मनिर्भर भारत घडविण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्यामुळे ही अतिशय अभिमानाची बाब आहे, असे ते गर्वाने म्हणाले होते. मेन्टेनन्स कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल शशिकर चौधरी यांनी जनरल बिपिन रावत यांचे स्वागत केले होते व रावत यांनी स्वदेशी विमाने व उपकरणांच्या प्रदर्शनालादेखील भेट दिली होती.

‘मल्टी मोड ग्रेनेड्स’चीदेखील पाहणीशेवटच्या नागपूर दौऱ्यादरम्यान जनरल  बिपिन रावत यांनी ‘ईईएल’ला (इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेड) भेट दिली होती व कंपनीतर्फे भारतीय सैन्यदलासाठी उत्पादित करण्यात आलेल्या ‘मल्टी मोड ग्रेनेड्स’ची पाहणी केली होती. सोबत त्यांनी इतर एक्सप्लोसिव्ह, मिसाईल्स, आर्म्ड ड्रोन्सचीदेखील पाहणी केली होती.

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावत