शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेच्या साडेपाच हजार बोगींत ‘बायोटॉयलेट’, २०१७-१८ अखेर २,४०० टॉयलेट कार्यान्वित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 05:01 IST

मध्य रेल्वेच्या ५,५३२ बोगीत बायोटॉयलेट कार्यान्वित करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेत एकूण १४ हजार ५६५ बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी यंदा (२०१७-१८) वर्षासाठी २,४०० बायोटॉयलेट बसविण्याचे लक्ष्य दिले आहे. त्यापैकी जुलैपर्यंत ४२५ बायोटॉयलेट बसविण्यात आले आहेत.

- महेश चेमटे मुंबई : मध्य रेल्वेच्या ५,५३२ बोगीत बायोटॉयलेट कार्यान्वित करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेत एकूण १४ हजार ५६५ बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी यंदा (२०१७-१८) वर्षासाठी २,४०० बायोटॉयलेट बसविण्याचे लक्ष्य दिले आहे. त्यापैकी जुलैपर्यंत ४२५ बायोटॉयलेट बसविण्यात आले आहेत.‘स्वच्छ रेल्वे-स्वच्छ भारत’ उपक्रमांतर्गत देशातील सर्व रेल्वे विभागातील लांब पल्ल्यांच्या ट्रेनमध्ये एकूण १ लाख ४० हजार बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहेत. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी २०१९ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. रेल्वे बजेटमध्ये बायोटॉयलेटसाठी विशेष तरतूद केली आहे. त्यानुसार, जुलै २०१७ पर्यंत ५,५३२ बायोटॉयलेट कार्यान्वित झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.बायोटॉयलेट विकसित करण्यासाठी, रेल्वे आणि डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशन (डीआरडीओ) यांच्यात करार करण्यात आला आहे. यानुसार, २०१९ पर्यंत लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून पारंपरिक शौचगृह हद्दपार करण्यात येणार आहे. त्या जागी बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहे. स्टेनलेस स्टील बनावटीच्या ६ चेंबर्ससहीत बायोटॉयलेटच्या संचाचे मूल्य ९० हजार इतके आहे.लांब पल्ल्यांच्या प्रवाशांकडून प्रवासादरम्यान पारंपरिक शौचालयाच्या अनेक तक्रारी मिळत होत्या. बायोटॉयलेटमुळे प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण होणार असल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात येत आहे. बायोटॉयलेटमुळे पाण्याचादेखील योग्य वापर होतो. परिणामी, पाण्याचे संवर्धनदेखील करता येणे शक्य असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्ये रेल्वे