शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 22:14 IST

पैलवान सिकंदर शेख याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी त्याला पंजाबमध्ये अटक केली होती.

महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याला पंजाबमधील शस्त्र तस्करी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला. पंजाबमधील कोर्टाने सिकंदर शेख याला जामीन मंजूर केला आहे. सिकंदर याच्यावर याआधी कोणताही गुन्हा दाखल नव्हता, तसेच देशाचा मोठा पैलवान असल्याची बाब लक्षात घेऊन जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!

दोन दिवसापूर्वी पंजाबमध्ये शस्त्रास्त्रांच्या तस्करी प्रकरणात सिकंदर शेखला अटक करण्यात आली होती. पंजाब पोलिसांनी सिकंदर शेखला शुक्रवारी केलेल्या अटकेमुळे कुस्ती वर्तुळात गोंधळ उडाला होता. पंजाबमधल्या पपला गुर्जर टोळीला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याच्या आरोपाखाली सिकंदरसह चौघांना अटक करण्यात आली होती.

सुप्रिया सुळेंनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळेंनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. "महाराष्ट्राचा मल्ल सिकंदर शेख यास जामीन मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान जी यांच्या संपर्कात होते. न्यायालयात आज सिकंदरची बाजू वकिलांनी अतिशय सक्षमपणे मांडली. अखेर त्याला आज जामीन मंजूर झाला असून तो लवकरच महाराष्ट्रात परत येईल. या संपूर्ण प्रकरणात पंजाबच्या मुख्यमंत्री महोदयांनी खुप सहकार्य केले याबद्दल त्यांचे मनापासून आभार. तसेच सिकंदरच्या वकिलांनी त्याची बाजू व्यवस्थितपणे मांडून त्याला जामीन मिळवून दिला, याबद्दल त्यांचेही मनापासून आभार', असे या पोस्टमध्ये सुळे यांनी म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Wrestler Sikandar Shaikh Gets Bail; Supriya Sule Thanks Chief Minister

Web Summary : Wrestler Sikandar Shaikh secured bail in a Punjab arms smuggling case. MP Supriya Sule thanked Punjab's Chief Minister for his cooperation. Shaikh's lawyer successfully argued his case, leading to his release and return to Maharashtra.
टॅग्स :Wrestlingकुस्तीCourtन्यायालयPunjabपंजाब