शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: राज्य सरकारमधील मंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 15:13 IST

Bachchu Kadu : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील अजून एक मंत्री अडचणीत आले आहेत. राज्य सरकारमधील महिला बालकल्याण आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोर्टाने दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

अमरावती - राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील अजून एक मंत्री अडचणीत आले आहेत. राज्य सरकारमधील महिला बालकल्याण आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोर्टाने दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये  मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याप्रकरणी बच्चू कडू यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी भाजपाचे तत्कालीन नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी २०१७ मध्ये बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यावर न्यायालयीन सुनावणी झाल्यानंतर या प्रकरणाचा आज निकाला आला आहे. त्या चांदूरबाजार येथील प्रथमवर्ग न्यायालयाने बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

बच्चू कडू यांच्याकडे मुंबईत सुमारे ४२ लाख ४६ हजार रुपयांचा स्वत:च्या मालकीचा फ्लॅट होता. मात्र २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडुकीत त्यांनी या फ्लॅटची माहिती लपवून ठेवली होती. दरम्यान, त्यावरून तक्रार करणारे गोपाल तिरमारे यांनी माहितीच्या अधिकारामधून याबाबतची माहिती मिळवली होती. त्याआधारावर त्यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.  

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्रात अंधेरी येथे 2011 मध्ये सदनिका विकत घेतली परंतु ही माहिती त्यांनी शपथ पत्रात दडविली होती.  या गंभीर प्रकरणी चांदूरबाजार तालुक्याचे भाजप सरचिटणीस गोपाल तिरमारे यांनी 27 डिसेंबर 2017 रोजी आसेगाव पोलिसात तक्रार दिली होती या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.  या प्रकरणी पाच वर्षांनी शुक्रवारी चांदूरबाजार येथील प्रथम श्रेणी दिवाणी न्यायालय क्रमांक १ यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांची शिक्षा आणि २५ हजारांचा दंड  ठोठावला आहे.  या प्रकरणी सरकारी वकील वानखडे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावतीCourtन्यायालय