शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 06:33 IST

Light Bill Hike: महावितरणने लादले इंधन समायोजन शुल्क : प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार, उद्योजकांसह, छोट्या व्यापाऱ्यांनाही झटका

- कमल शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दिवाळीच्या तोंडावर महावितरणनेवीज दरवाढ जाहीर करून ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे, घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग ग्राहक सर्वांवर तडाखा बसेल; सणसुदीत खरेदी-खर्चावर आता वीज बिलाचा अतिरिक्त भारही जोडला गेला आहे.

१ ऑक्टोबर रोजी महावितरणने एक सर्क्युलर जारी करून सप्टेंबरमध्ये झालेल्या वीज वापराबाबत इंधन समायोजन शुल्क आकारण्याचे आदेश दिले आहेत. १ जुलैपासून महावितरणने वीज दर कमी केल्याचा दावा करत नवीन दर लागू केले होते. मात्र, लगेचच ऑगस्टपासून इंधन समायोजन शुल्क लादण्यास सुरुवात झाली आणि आता सप्टेंबरसाठीही ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. याचा फटका सर्व प्रकारच्या ग्राहकांना बसणार आहे. १ ते १०० युनिट वापरावर प्रति युनिट ३५ पैसे आणि ५०० युनिटपेक्षा अधिक वापरावर ९५ पैसे प्रति युनिट जास्त द्यावे लागणार आहे.

 सूत्रांचे म्हणणे आहे की, ही दरवाढ येत्या काही महिन्यांतही सुरूच राहील. महावितरणचे म्हणणे आहे की, वीज मागणी वाढल्यामुळे ओपन मार्केटमधून महाग दराने वीज खरेदी करावी लागली. तसेच, अधिक उत्पादन खर्च असलेल्या युनिट्सचा वापर करावा लागला. या अतिरिक्त खर्चाची भरपाई आता इंधन समायोजन शुल्क लादून केली जात आहे.

घरगुती ग्राहकांवर असा पडणार भार श्रेणी        प्रति युनिट - इंधन समायोजन शुल्क बीपीएल        १५ पैसे१ ते १०० युनिट        ३५ पैसे१०१ ते ३०० युनिट        ६५ पैसे३०१ ते ५०० युनिट        ८५ पैसे    ५०१ पेक्षा जास्त        ९५ पैसे

इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग महागणार, शेतकऱ्यांनाही बसणार फटकाइलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनवरही इंधन समायोजन शुल्क लादण्यात आले आहे. त्यामुळे आता चार्जिंगसाठी प्रति युनिट ४५ पैसे अधिक द्यावे लागतील. मेट्रो व मोनोरेलसाठी ४५ पैसे प्रति युनिट अधिक द्यावे लागणार. शेतकऱ्यांनाही वीज दरात प्रति युनिट ४० पैसे अधिक द्यावे लागणार आहेत.

उद्योजक -व्यापाऱ्यांवर दुहेरी मार : उद्योगपती आणि व्यापाऱ्यांना या वीज दरवाढीचा दुहेरी मार सहन करावा लागणार आहे. संपलेल्या ३० सप्टेंबर रोजीच ‘कुसुम घटक ब’ साठी निधी उभारण्यासाठी राज्य सरकारकडून औद्योगिक व व्यापारी वीज दरावर ९.९० पैसे प्रति युनिट एवढा कर लावला होता. आता एलटी औद्योगिक कनेक्शनसाठी प्रति युनिट ४० ते ५० पैसे आणि एचटी औद्योगिक कनेक्शनसाठी ५० पैसे प्रति युनिट एवढा इंधन समायोजन शुल्क लादण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Electricity Hike Before Diwali: Bills to Surge Significantly

Web Summary : Maharashtra electricity board (MSEDCL) announces pre-Diwali power tariff hike. Bills to increase by 35-95 paise per unit, impacting homes, businesses, and industries. Fuel adjustment charges are cited as the reason, adding to financial burden.
टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज