शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

आरटीओच्या शुल्कात मोठी वाढ

By admin | Updated: January 7, 2017 00:54 IST

केंद्र सरकारने मोटार-वाहन विभागातील विविध शुल्कांमध्ये मोठी वाढ केली आहे.

पुणे : केंद्र सरकारने मोटार-वाहन विभागातील विविध शुल्कांमध्ये मोठी वाढ केली आहे. सुधारित शुल्क रचनेनुसार शिकाऊ परवान्यासाठी आता १५० रुपये मोजावे लागणार असून, स्मार्ट कार्ड नमुन्यात नोंदणी प्रमाणपत्रासाठी २०० रुपये अतिरिक्त शुल्क असेल. याशिवाय इतर शुल्कांमध्येही वाढ करण्यात आली असून, २९ डिसेंबरपासून हे दर लागू करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली. मोटार वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती करून विविध कामांसाठीच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. याबाबत केंद्र सरकारने २९ डिसेंबर रोजी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार ही शुल्कवाढ लागू होणार आहे. शिकाऊ, पक्का पक्क्या परवान्याबरोबरच आंतरराष्ट्रीय चालक परवाना, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, डुप्लिकेट परवाना, वाहनांचे फिटनेस शुल्क, पत्ता बदलणे, वाहनांचे पासिंग, ट्रेड सर्टिफिकेट अशा विविध शुल्कांमध्ये वाढ करण्यात आली आहे. सर्व वाहनांच्या फिटनेस शुल्कामध्ये जवळपास ५० टक्के वाढ करण्यात आली आहे. वाहन हस्तांतर शुल्कासाठी खासगी, प्रवासी व इतर प्रकारच्या वाहनांसाठी पूर्वी १० ते चारशे रुपये आकारले जात होते. आता हे शुल्क २५ ते २५०० रुपये असेल. वाहन नोंदणीसाठी पूर्वी विविध प्रकारच्या वाहनांसाठी २० ते ८०० रुपये आकारले जात होते. त्यात आता ५० ते ५ हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. रहिवासी पत्त्यात बदल व मोटार वाहनातील फेरफार नोंदविण्यासाठी पूर्वी अनुक्रमे २० व ५० रुपये शुल्क आकारले जात होते. हे शुल्क वाहनांच्या प्रकारानुसार २५ ते अडीच हजार रुपये राहील. दरम्यान, ही शुल्कवाढ करताना केंद्र सरकारने वाहतूकदारांशी कुठल्याही प्रकारची चर्चा केली नाही. अचानकपणे एकाधिकारशाही पद्धतीने शुल्क वाढविण्याचा निर्णय अयोग्य आहे. याविरोधात आंदोलन केले जाईल. त्यामुळे ही वाढ रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेने केली आहे. (प्रतिनिधी)>वाहन नोंदणी शुल्क नवीन नोंदणी, नूतनीकरण जुनेनवीन अपंगांसाठीचे वाहन२०५०दुचाकी६०३००तीनचाकी, हलके मोटारवाहन२००३०० >परवानाविषयक सुधारित शुल्कजुने शुल्क नवीन शुल्कशिकाऊ परवाना३११५०शिकाऊ परवाना चाचणी/फेरचाचणी-५०पक्का परवाना१००२००आंतरराष्ट्रीय परवाना५००१०००मोटार ड्रायव्हिंग स्कूल शुल्क२५००१०,०००मोटार ड्रायव्हिंग स्कूल डुल्पिकेट परवाना२५००५०००परवान्यातील पत्त्यात बदल करणे २०२००