शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनात मोठा खांदेपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 06:48 IST

राज्य सरकारने सोमवारी ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना मोठा खांदेपालट केला. सुनील पोरवाल यांच्याकडे गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना मोठा खांदेपालट केला. सुनील पोरवाल यांच्याकडे गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.आतापर्यंत अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) असलेले सुधीरकुमार श्रीवास्तव यांची बदली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. श्रीवास्तव हे मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत होते. मात्र ती संधी दिनेशकुमार जैन यांना देण्यात आली. श्रीवास्तव यांची गृह विभागातून बदली करण्यात येणार असल्याचे वृत्त लोकमतने आधीच दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदेश दौºयावर रवाना होण्यापूर्वी आयएएस अधिकाºयांच्या बदल्यांना मंजुरी दिली.उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची बदली सामान्य प्रशासन विभागात त्याच पदावर करण्यात आली आहे.आज गृह विभागात पाठविण्यात आलेले सुनील पोरवाल आतापर्यंत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते.पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई यांना आता पोरवाल यांच्या जागी उद्योग,ऊर्जा विभागात पाठविण्यात आले आहे.वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) वंदना कृष्णा या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या नव्या अतिरिक्त मुख्य सचिव असतील. आतापर्यंत शालेय शिक्षण विभाग सांभाळत असलेले नंदकुमार यांना प्रतीक्षेवर ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव अनिल डिग्गीकर हे पर्यावरण विभागाचे नवे प्रधान सचिव असतील. सामान्य प्रशासन विभागात प्रधान सचिव असलेले राजगोपाल देवरा यांची बदली त्याच पदावर वित्त विभागात (सुधारणा) करण्यात आली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशीषकुमार सिंग हे आता परिवहन विभागाचे प्रधान सचिव असतील. त्यांच्या जागी सार्वजनिक बांधकाम विभागात मनोज सौनिक येत आहेत. सौनिक हे आतापर्यंत परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव होते.मनोज सूर्यवंशी हे नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक असतील. संजय मिणा यांची बदली आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त (ठाणे) या पदावर करण्यात आली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार