शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

पोलीस दलात मोठे बदल; १५ आयपीएसच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 07:02 IST

राज्य सरकारने बुधवारी १५ आयपीएस अधिकाऱ्यांची बदली केली.

मुंबई : राज्य सरकारने बुधवारी १५ आयपीएस अधिकाऱ्यांची बदली केली. प्रभात कुमार, अर्चना त्यागी, संजय सक्सेना, प्रशांत बुरडे, आर. डी. शिंदे, डॉ. सुहास वारके, अश्वती दोर्जे, डॉ. छेरिंग दोर्जे, के. एम. मल्लिकार्जून प्रसन्ना, यशस्वी यादव या दहा अधिकाºयांना पदोन्नती देण्यात आली आहे.सह पोलीस आयुक्त (प्रशासन) मुंबई अर्चना त्यागी यांना पदोन्नतीने अतिरिक्त पोलीस महासंचालक (राज्य राखीव पोलीस दल; मुंबई) येथे पाठविण्यात आले आहे. सह पोलीस आयुक्त (गुन्हे); मुंबई संजय सक्सेना आता प्रशिक्षण व खास पथके विभाग; मुंबईचे नवे अतिरिक्त पोलीस महासंचालक असतील. कायदा व सुव्यवस्था; मुंबई येथील विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभात कुमार आता पदोन्नतीने आर्थिक गुन्हे शाखेचे (मुंबई) अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून जात आहेत.नवी मुंबईचे सह पोलीस आयुक्त प्रशांत बुरडे यांना पदोन्नतीने उप महासमादेशक गृहरक्षक दल व उपसंचालक नागरी संरक्षण या पदावर पाठविण्यात आले आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई हे आता अतिरिक्त पोलीस महासंचालक (आस्थापना; मुंबई) असतील. सागरी सुरक्षा व व्हीआयपी सुरक्षेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक धनंजय कमलाकर यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक (नियोजन व संनियंत्रण) या पदावर पाठविण्यात आले आहे. मध्यंतरी वादात सापडलेले कमलाकर यांचे हे पुनर्वसन मानले जाते.देवेन भारती यांना मुंबई सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) या पदावर तूर्त कायम ठेवण्यात आले आहे.यादव यांची प्रतीक्षा संपलीऔरंगाबादच्या पोलीस आयुक्त पदावर असताना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले यशस्वी यादव यांची बदली सागरी सुरक्षा व व्हीआयपी सुरक्षा; मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे.यशस्वी यादव अनेक दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. आता त्यांना पदोन्नती देऊन पाठविण्यात आले असले तरी ही ‘साईड पोस्टिंग’ मानली जाते. गुन्हे अन्वेषण विभाग; पुणेचे पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांची बदली अमरावती परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पथक; मुंबईचे पोलीस उप महानिरीक्षक डॉ. सुहास वारके हे आता नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असतील.सशस्र पोलीस मुख्यालय; नायगाव मुंबई येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त असलेल्या अश्वती दोर्जे यांची बदली पदोन्नतीने महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे संचालकपदी करण्यात आली आहे. डॉ. छेरिंग दोर्जे हे आतापर्यंत पश्चिम प्रादेशिक विभाग; मुंबई येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त होते. आता त्यांची बदली पदोन्नतीने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे.अतिरिक्त पोलीस आयुक्त; गुन्हे शाखा मुंबई के. एम. एम. प्रसन्ना हे नागपूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक असतील.