शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय टोलेबाजीचे थरावर थर! सर्वसामान्यांचे मनोरंजन; ‘जय जवान’ची ९ थर रचून सलामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 05:35 IST

ठाण्याच्या टेंभी नाका येथे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित दहीहंडी उत्सवात नऊ थरांचा मानवी मनोरा रचून सलामी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क । ठाणे/मुंबई  

निमित्त होते दहीहंडी उत्सावाचे परंतु यावेळी  उपस्थित असलेल्या नेत्यांना राज्यात अलिकडेच झालेल्या सत्तांतरांवर टीकाटिप्पणी करण्याचा मोह टाळता आला नाही. या टोलेबाजीमुळे सर्वसामान्यांचे मात्र चांगले मनोरंजन झाले. जोगेश्वरी उपनगरातील जय जवान गोविंदा पथकाच्या तरुणांनी शुक्रवारी ठाण्याच्या टेंभी नाका येथे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित दहीहंडी उत्सवात नऊ थरांचा मानवी मनोरा रचून सलामी दिली. एकावर एक थर रचण्यासाठी सरसर वर चढत असताना तिथे उपस्थित नागरिक कौतुकाने पाहत होते. 

एकनाथ शिंदे: ५० थरांची  हंडी, आम्ही आधीच फाेडली

दीड महिन्यांपूर्वी आम्ही ५० थर लावून मोठी राजकीय हंडी फोडली, असा टोला लगावतानाच, गोविंदा नऊ थर लावून हंडी फोडतात; पण आमचे थर येत्या काळात आणखी वाढतील, मलई मात्र सामान्यांना मिळेल या शब्दांत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत आणखी फोडाफोडीचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गोकुळाष्टमीनिमित्त मुंबई, ठाण्यात दहीहंडीचे जंगी कार्यक्रम उत्साहात झाले. 

देवेंद्र फडणवीस: मलई तर सामान्यांनाच मिळणार

मुंबईतील वरळीचे जांबोरी मैदान व अन्य ठिकाणी भाजप व काही मंडळाच्या वतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात फडणवीस यांनी, आता जी दहीहंडी फोडली आहे त्याचे लोणी सामान्यांना मिळणार आहे. राज्याच्या विकासातही हाच अनुभव सगळ्यांना येईल, मूठभर लोकांनाच सरकारचा फायदा होणार नाही, असे म्हणत आधीच्या ठाकरे सरकारला चिमटे काढले. 

आदित्य ठाकरे: थर लावले की त्यांचा थरकाप उडालाय

त्यांनी ५० थर लावले की त्यांचा थरकाप उडालाय, हे सगळ्यांना ठावूक आहे, असे प्रत्युत्तर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले. ते म्हणाले की, किमान आज तरी राजकारण नको, प्रत्येक ठिकाणी राजकारणाची गरज नाही. २४ तास राजकारण केले तर सणांचे महत्त्व काय राहील?

टॅग्स :Dahi HandiदहीहंडीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस