शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

रेल्वे कर्मचार्‍याच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना

By admin | Updated: June 8, 2014 23:18 IST

मूर्तिजापूर स्थानकावरून रवाना झालेली कुर्ला हावडा शालीमार एक्स्प्रेसची बोगी क्षतिग्रस्त; दुर्घटना टळली.

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर स्थानकावरून नागपूरच्या दिशेने रवाना झालेल्या 18029 डाऊन कुर्ला हावडा शालीमार एक्स्प्रेसची एस-१ ही बोगी क्षतिग्रस्त असल्याचे रेल्वे कर्मचार्‍याच्या लक्षात येताच त्वरित थांबविण्यात आली व पुढील मोठा अनर्थ टळला. दोन तासांच्या अवधीनंतर मूर्तिजापूर स्थानकावर थांबलेल्या शालीमार एक्स्प्रेसची क्षतिग्रस्त बोगी गाडीपासून विलग करण्यात आली व त्यानंतर गाडी नागपूरकडे रवाना झाली. कुर्ला हावडा शालीमार एक्स्प्रेसने अकोला रेल्वे स्थानक सोडल्यानंतर सकाळी ९.१३ वाजता मूर्तिजापूर रेल्वे स्थानक गाठले. तीन मिनिटांच्या अंतराने ९.१५ वाजता गाडी नागपूरच्या दिशेने रवाना झाली खरी, पण धिम्या गतीने पुढे सरकणार्‍या गाडीची ह्यएस-१ह्ण या बोगीखालील चाकांजवळील भाग क्षतिग्रस्त होऊन त्यास तडा गेल्याची बाब सीएनडब्यू टेक्निशियन विजय नाईक यांच्या निदर्शनास आली. तत्काळ नाईक यांनी सदर गंभीर बाब मूर्तिजापूरचे स्टेशन मास्तरांच्या लक्षात आणून दिली. त्याच तत्परतेने स्टेशन मास्तरांनी गाडीला रेड सिग्नल दाखविण्याचे आदेश देऊन गाडी थांबविली. इर्मजन्सी ब्रेकमुळे क्षणार्धात थांबलेली शालीमार एक्स्प्रेस परत मागे मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर आणण्यात आली. यानंतर ११.१0 वाजता ही गाडी नागपूरच्या दिशेने रवाना झाली.

**हाटिया एक्स्प्रेसला विलंब सदर घटनेमुळे मागाहून येणार्‍या हाटिया एक्स्प्रेसलासुद्धा सिग्नल न मिळाल्याने मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाबाहेर दोन तास थांबून रहावे लागले. यामुळे दररोज अप-डाऊन करणार्‍या प्रवाशांना मूर्तिजापूर थांबा नसलेल्या हाटिया एक्स्प्रेसने प्रवास करण्याची संधी मिळाली.

**रेल्वे कर्मचार्‍याचे प्रसंगावधान

मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरून निघणार्‍या गाड्यांच्या निरीक्षणाची जबाबदारी पार पाडणार्‍या सीएनडब्यू टेक्निशियन विजय नाईक यांच्या प्रसंगावधानामुळे क्षतिग्रस्त बोगी घेऊन धावणार्‍या शालीमार एक्स्प्रेसची संभाव्य दुर्घटना टळली. ही बाब लक्षात आली नसती तर मोठी प्राणहानी घडली असती. दैव बलवत्तर म्हणून बचावलो असे म्हणत अनेक प्रवाशांनी विजय नाईक यांचे आभार मानलेत.