शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

काम अर्धवट असताना कंत्राटदाराला दिले बील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 2:27 AM

माजी नगरसेवकाने वेधले लक्ष; पावसामुळे येथे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

कल्याण : पूर्वेतील एका रस्त्याचे काम अर्धवट केलेले असताना महापालिकेने कंत्राटदाराला ९० टक्के बिलाची रक्कम दिली आहे. या विरोधात मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांनी आक्षेप घेतला आहे. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास उपोषणाचा इशारा गायकवाड यांनी महापालिका प्रशासनास दिला आहे.पूर्वेतील प्रभाग क्रमांक १०० मध्ये शंभर फुटी रस्ता तयार करण्यास महापालिकेने २००९ मध्ये मंजुरी दिली होती. या कामाची निविदा आठ कोटी ४५ लाख रुपये खर्चाची होती. कंत्राटदाराने या रस्त्याचे काम अर्धवट केले आहे. तेथे रस्त्यावर केवळ खडी टाकली आहे. पावसामुळे येथे चिखलाचे साम्राज्य आहे. दुभाजक अर्धवट अवस्थेत बसविले आहेत. असे असताना रस्ता पूर्ण करण्यासाठी आणखी दोन कोटी रुपये त्याने मागितले आहेत. काम अर्धवट असताना महापालिकेने सात कोटी ६६ लाख बिल कंत्राटदारास दिले आहे.आमराई परिसरातील रस्ता १८ मीटर रुंद करण्यासाठी २०१४ मध्ये मंजुरी देण्यात आली. हे काम १३ कोटी ५० लाख रुपये खर्चाचे आहे. रस्ते रुंदीकरणात बाधिताना विरोध केल्याने या रस्त्याचेही काम रखडले आहे. काम अर्धवट असताना कंत्राटदाराला तीन कोटी सहा लाखांचे बिल दिले. गायकवाड यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळविलीे.

टॅग्स :Potholeखड्डेthaneठाणेroad safetyरस्ते सुरक्षा