शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ-मनमाड तिसरा मार्ग २०२५ पासून सेवेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 08:52 IST

१८३ किलोमीटरचा रेल्वेमार्ग : आजमितीला ५० टक्के काम झाले पूर्ण

जळगाव : चाळीसगावपर्यंतचे तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून सध्या ५० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे भुसावळ-मनमाड तिसरा रेल्वेमार्ग २०२५ पर्यंत सेवेत दाखल होईल, अशी  माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई ते दिल्ली या मध्य रेल्वे मार्गावर गेल्या काही वर्षांत रेल्वे प्रवासी व मालगाड्यांची संख्या दुप्पट वाढली आहे. त्यामुळे सध्या दर दहा मिनिटाला गाडी धावत आहे. अप व डाऊन या दोन्ही मार्गांवर गाड्यांची वर्दळ वाढमुळे रेल्वे मंत्रालयाने २०१५ मध्ये भुसावळ ते मनमाड दरम्यान तिसऱ्यामार्गाच्या कामाला मंजुरी दिली होती. सुरुवातीला रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते जळगाव दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण केले. २०२० मध्ये जळगावहून पुढे तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात केली आहे. ७१ किलोमीटरचा मार्ग केवळ दीड वर्षात पूर्ण केला आहे. सध्या या मार्गावरून मालगाड्या धावत आहेत. 

नांदगाव ते मनमाड दरम्यान सपाटीकरण पूर्ण  नांदगाव ते मनमाड दरम्यान सपाटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच या ठिकाणी रूळ टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. लवकरच चाळीसगावहून पुढे नांदगावपर्यंतच्या कामालाही सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.

१३६० कोटींचा खर्चभुसावळ-मनमाड तिसऱ्या रेल्वेमार्ग साकारण्यासाठी १३६० कोटींचा खर्च होणार आहे. १८३ किलोमीटर अंतराचा रेल्वे मार्ग सेवेत दाखल झाल्यावर प्रवाशांना जलद सेवा मिळणार आहे.

भुसावळ ते मनमाड दरम्यान उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. २०२५ पर्यंत या मार्गावरून प्रत्यक्षात रेल्वे धावण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. - डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

पाचोरा-चाळीसगावचे कामही प्रगतिपथावरजळगाव ते पाचोरादरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर पाचोरा ते चाळीसगाव दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे कामही हाती घेतले आहे. सध्या या मार्गावर सपाटीकरणाचे काम बहुतांश ठिकाणी पूर्ण झाले आहे. तसेच, भुयारी बोगद्याचे काम सुरू आहे. पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत या मार्गाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.