शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

महायुतीतील घटक पक्षांच्या हाती 'भोपळा'

By admin | Updated: October 20, 2014 06:57 IST

राज्यात भाजपाने जोरदार मुसंडी घेतली असताना भाजपसोबत असलेल्या स्वाभिमानी, रिपाइं (आठवले गट), रासप तसेच शिवसंग्राम या पक्षांना मात्र घाटा झाला आहे.

सुधीर लंके■ अहमदनगरराज्यात भाजपाने जोरदार मुसंडी घेतली असताना भाजपसोबत असलेल्या स्वाभिमानी, रिपाइं (आठवले गट), रासप तसेच शिवसंग्राम या पक्षांना मात्र घाटा झाला आहे. डावे पक्ष व समाजवादी पक्षालाही अवघी एकेक जागा मिळाली. शेकापचा 'खटारा' तीन जागांवरच अडकला तर विनय कोरेंचा 'जनसुराज्य' पक्षही नामशेष झाला. युती फिस्कटल्यानंतर भाजपसोबत जात स्वाभिमानीने १२ जागा लढविल्या. मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. राजू शेट्टी यांचे वर्चस्व असलेल्या कोल्हापूर जिलतही पक्षाचा पराभव झाला. २00९ च्या विधानसभेत या पक्षाला एक जागा मिळाली होती. यावेळी मात्र भोपळाही फुटला नाही. राष्ट्रीय समाज पक्षाने दौंड, कळमनुरी, भूम-परांडा, गंगाखेड व मान-खटाव या पाच मतदारसंघात महायुतीकडून निवडणूक लढवली. मात्र यापैकी त्यांना केवळ दौंड मध्ये राहुल कुल यांच्या रुपाने विजय मिळाला. अहमदपूरचे पक्षाचे आमदार बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे यावेळी तेथून विनायक पाटील हे रासपकडून निवडणूक लढले व विजयी झाले. परंतु भाजपने ही जागा रासपला न सोडल्याने पाटील यांना भाजपच्या विरोधात अपक्ष लढावे लागले. त्यामुळे ही जागा तांत्रिकदृष्ट्या रासपत मोडत नाही. रिपाइंच्या आठवले गटाला भाजपने आठ जागा दिल्या होत्या. मात्र रिपाइंकडे स्वत:चे चिन्हच नसल्याने या मतदारसंघांमध्ये भाजपने स्वत:चे उमेदवारही कमळ चिन्हावर उभे करुन आठवलेंना कात्रजचा घाट दाखविला. त्यामुळे रिपाइंला एकही जागा मिळू शकलेली नाही असे या पक्षाच्या जबाबदार पदाधिकार्‍यांनी सांगितले. शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनाही पराभव स्वीकाराला लागला. त्यामुळे 'रासप'च्या एका जागेचा अपवाद वगळता महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या हाती 'भोपळा' आला आहे. शेतकरी कामगार पक्षाला गतवेळी चार जागा मिळाल्या होत्या. यावेळी सांगोला, अलिबाग व पेण या तीन जागांवर त्यांना विजय मिळाला. सांगोला येथून गणपतराव देशमुख यांनी सलग अकरावा विजय मिळवून इतिहास रचला आहे. समाजवादी पक्षाचे गत विधानसभेत चार सदस्य होते. यावेळी मात्र त्यांना केवळ अबु आझमी यांची एक जागा मिळाली. भारिप बहुजन महासंघाने ८५ जागा लढविल्या. मात्र या पक्षाचे केवळ बाळापूर येथील बळीराम शिरासकर विजयी झाले. डाव्या लोकशाही समितीतील माकपने कळवमधून जिवा पांडू गावित यांना पुन्हा विधानसभेत पाठविले. मात्र डहाणूची जागा त्यांना गमवावी लागली. बहुजन विकास आघाडीला यावेळी एका जागेचा फायदा होऊन त्यांचे हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर व विलास तरे असे तीन आमदार विधानसभेत पोहोचले. विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाचीही पुरती वाताहत झाली. कोरे यांच्यासह त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाले. गतवेळी या पक्षाचे दोन आमदार होते. 2014 2009 स्कोअर बोर्ड माकप 01 01 01 00 स्वाभिमानी 01 01 रासप 00 00 रिपाइं 00 00 जनसुराज्य जागा बविआ भारिप 02 01 02 04 03 01 00 03 शेकाप