शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भूमाता ब्रिगेडच्या महिलांचा आरोपीला चोप

By admin | Updated: February 7, 2017 22:00 IST

सॉफ्टवेअर इंजिनीअर रसिला राजू ओ पी हिचा खून करणाऱ्या सुरक्षारक्षकाला भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी भर न्यायालयात चोप दिला

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 7 - हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीतील सॉफ्टवेअर इंजिनीअर रसिला राजू ओ पी हिचा खून करणाऱ्या सुरक्षारक्षकाला भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी भर न्यायालयात चोप दिला. बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याला तातडीने बाजूला नेले. पोलिसांनी तृत्पी देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन सायंकाळी सोडून दिले. भाबेन भराली सैकिया या सुरक्षारक्षकाची पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपत असल्याने त्याला पोलिसांनी दुपारी न्यायालयात आणले होते. त्यावेळी अधिक तपासासाठी त्याला २ दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली होती. यास बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. बी. ए. आलुर, अ‍ॅड. तौसिफ शेख आणि अ‍ॅड. साजिद शाह यांनी विरोध केला. पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे सैकिया याला पोलीस कोठडी देण्याची गरज नाही, असे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने सैकिया याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.न्यायालयाच्या निर्णयानंतर दुपारी चारच्या सुमारास पोलीस त्याला घेऊन नव्या इमारतीच्या बाहेर आले. तोपर्यंत भूमाता ब्रिगेडच्या महिला कडेला दबा धरून बसल्या होत्या. तो बाहेर येताच या महिलांनी धावत जाऊन पोलिसांच्या मध्ये असलेल्या भाबेन याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्याच्याभोवती कडे करून पुन्हा मागे घेऊन गेले. त्यानंतर काही महिला बाजूला गेल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याला धावतच बाहेर नेण्यास सुरुवात केली. तेव्हा आणखी दोन-तीन महिलांनी त्याला अडवून चोप दिला. तृप्ती देसाई यांच्यासमवेत मनीषा टिळेकर, रंजना कांबळे, ख्वाजा बी मोमीन, प्रज्ञा जगताप, मंजिरी चौधरी या सहभागी झाल्या होत्या.

याविषयी बोलताना तृप्ती देसाई यांनी सांगितले की, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही़ आमचा कायद्यावर विश्वास आहे. पण कोपर्डी प्रकरणात आरोपींना सहा महिन्यात शिक्षा होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्याला सहा महिने उलटूनही अजून शिक्षा झालेली नाही. पोलिसांनी आधीच खबरदारी घेतली असती तर ही घटना घडली नसती. आरोपींमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी ही ताईगिरी सुरू केली आहे. राज्यात जेथे जेथे अशा घटना घडतील तेथे भूमाताच्या रणरागिणी अशा गुन्हेगारांवर दहशत बसविणार आहे. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी हिंजवडीत आज वॉक विथ पोलीस सुरु केला आहे़ आम्ही त्यांना शहरातील अनेक अवैध धंदे दाखवून देण्यास तयार आहोत, त्या आमच्याबरोबर वॉक करतील का, असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित केला आहे. न्यायालयातील पोलिसांनी आरोपीला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल या महिलांना ताब्यात घेतले व काही वेळाने सोडून दिले़