शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांचा साखर कारखाना ताब्यात

By admin | Updated: March 22, 2016 04:26 IST

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी नाशिकमधील गिरणा साखर कारखाना आणि २९० एकर जमीन अशी ५५ कोटींची मालमत्ता ताब्यात घेतली

डिप्पी वांकानी,  मुंबईमहाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी नाशिकमधील गिरणा साखर कारखाना आणि २९० एकर जमीन अशी ५५ कोटींची मालमत्ता ताब्यात घेतली. भुजबळ कुटुंबीयांनी ‘आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीद्वारे या कारखान्याची लिलावात खरेदी केली होती, असा ईडीचा आरोप आहे. ऋणवसुली प्राधिकरणाने २००९ मध्ये हा लिलाव केला होता. ज्या कंपनीच्या माध्यमातून कारखाना घेण्यात आला ती कंपनी भुजबळ कुटुंबीयांची असून, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून लाचेच्या रूपाने मिळालेला पैसा याच कंपनीत वळता करण्यात आला, असे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले. गिरणा कारखाना लिलावाद्वारे खरेदी करण्यात आला. लिलाव प्रक्रियेतही गैरव्यवहार झाला असल्याचा संशय असून, त्याचा आम्ही तपास करत नाही आहोत, असे ईडीचा अधिकारी म्हणाला. भुजबळांच्या वतीने डमी कंपन्यांनीही बोली लावली होती. तथापि, सर्वात कमी बोली लावणाऱ्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला हा कारखाना देण्यात आला. ईडीने ताब्यात घेतलेल्या मालमत्तांची किंमत ढोबळ अंदाज व सरकारी दरानुसार ५५ कोटींच्या घरात आहे. तथापि, त्यांचे बाजारमूल्य आमच्या अंदाजाहून कितीतरी अधिक आहे, असे ईडीचे म्हणणे आहे. ईडीने कारखाना व हा कारखाना ज्या जमिनीवर उभा आहे ती जमीन ताब्यात घेतली असून, जप्तीच्या या कार्यवाहीची माहिती प्राधिकृत अधिकाऱ्याला ३० दिवसांच्या आत दिली जाईल. हा अधिकारी भुजबळ कुटुंबीयांकडे याबाबत स्पष्टीकरण मागेल आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच या जप्तीबाबत निर्णय घेईल. त्यानंतरच आम्ही परिसर रिकामा करण्याची नोटीस बजावून या मालमत्तांचा ताबा घेऊन त्यांना सील ठोकणार आहोत, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. ईडीने यापूर्वी परवेश कन्स्ट्रक्शनची ११० कोटी रुपयांची सॉलिटेअर बिल्डिंग ताब्यात घेतली होती. समीर आणि पंकज भुजबळ गेल्या डिसेंबरमध्ये या कंपनीचे संचालक होते. तत्पूर्वी ईडीने याच प्रकरणात चमणकर इन्टरप्रायजेसची १७.३५ कोटी रुपयांची मालमत्ता हस्तगत केली होती. आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लि. ही खासगी कंपनी असून २२ नोव्हेंबर २००६ रोजी तिची स्थापना केली होती. पंकज भुजबळ, समीर भुजबळ आणि सत्यन अप्पा केसरकर हे संचालक असलेल्या या कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबर २०१५ रोजी घेण्यात आली होती. उद्योग व्यवहार मंत्रालयाकडील नोंदीनुसार, कंपनीने शेवटचा ताळेबंद ३१ मार्च २०१५ रोजी सादर केला होता. ३१ मार्चपर्यंत कोठडीत : छगन भुजबळ यांचे पुतणे समीर याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्याचा आदेश सोमवारी न्यायालयाने दिला. समीरला कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात आणले होते.