शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

भुजबळ कुटुंबाची एसीबी चौकशी

By admin | Updated: February 22, 2015 02:32 IST

राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गेल्या काही वर्षांत गोळा केलेल्या सुमारे २,५०० कोटी रुपयांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची खुली चौकशी होणार आहे.

गृह विभागाची मान्यतायदु जोशी - मुंबईराज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गेल्या काही वर्षांत गोळा केलेल्या सुमारे २,५०० कोटी रुपयांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची खुली चौकशी करण्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबी) विनंती राज्याच्या गृह विभागाने मान्य केली असून, आता अंतिम निर्णयासाठी फाइल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली आहे, अशी सूत्रांनी माहिती दिली. स्वत: भुजबळ, त्यांचे पुत्र आमदार पंकज, पुतणे समीर भुजबळ यांच्यासह आणखी काही नातेवाइकांची या बेहिशेबी मालमत्तेबाबत खुली चौकशी करण्याची परवानगी एसीबीने सरकारकडे मागितली होती. गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी ही मान्यता दिल्यानंतर शुक्रवारी ही फाइल मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पोचली आहे. एसीबीकडून चौकशीसाठी आलेली कोणतीही फाइल आपण पेंडिंग ठेवत नाही, असे फडणवीस वारंवार सांगत आले आहेत. त्यामुळेच आता ते भुजबळ यांच्या फाइलबाबत कधी आणि काय निर्णय घेतात, याबाबत उत्सुकता आहे. एसीबीने खुल्या चौकशीची परवानगी मागितल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १८ फेब्रुवारीच्या अंकात दिले होते.