शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

डोंबिवलीत घरपोच मिळणार भाजी

By admin | Updated: February 27, 2017 04:09 IST

शेतकऱ्यांनी पिकवलेला ताजा भाजीपाला बाजारभावापेक्षा कमी दरात आणि तेही थेट घरपोच डोंबिवलीकरांना उपलब्ध होणार आहे.

जान्हवी मोर्ये,डोंबिवली- ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि शहापूर येथील शेतकऱ्यांनी पिकवलेला ताजा भाजीपाला बाजारभावापेक्षा कमी दरात आणि तेही थेट घरपोच डोंबिवलीकरांना उपलब्ध होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे भाजीची नोंदणी नोंदवता येणार आहे. त्याचा सर्वाधिक फायदा नोकरदार महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. पूर्वेतील पंचायत विहीर परिसरात राहणाऱ्या सुधीर गोगटे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. गोगटे यांनी गणेशोत्सवापासून दादर आणि माहीम परिसरात ‘स्वस्त दरात भाजीपाला’ हा उपक्रम सुरू केला. त्यासाठी त्यांनी काही राजकीय पक्षांचा आधार घेतला. परंतु, त्यांच्याकडून या उपक्रमात सातत्य दिसत नसल्याने त्यांनी स्वत:च ‘शेतकरी तुमच्या दारी’ या धर्तीवर हा उपक्रम डोंबिवलीत सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. नोकरदार महिला घरची कामे उरकून कामाला जातात. घरी परतल्यानंतर स्वयंपाक, पाल्यांचा अभ्यास तसेच घरगुती कामे असतात. तसेच काही वयोवृद्ध मंडळींना बाजारात जाऊन भाजी खरेदी करणे शक्य होत नाही. त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरी भाजी काय करायची, हा प्रश्न असतोच. या मंडळींना त्यांच्या मागणीप्रमाणे पाव-अर्धा किलोपासून आणि त्यांच्या आवडीनिवडीनुसार घरपोच भाजी दिल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी कल्पना त्यांच्या मनात आली. त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपचा आधार घेतला. विविध ग्रुप्सवर त्यांनी भाज्यांचा तपशील आणि दर देणे सुरू केले. सध्या त्यांच्याकडे दिवसाला ३५ पेक्षा जास्त ग्राहक भाजीसाठी नोंदणी करत आहेत. घरपोच भाजी देण्यासाठी ते कोणताही जास्त दर घेत नाहीत. याउलट त्यांच्याकडे भाज्या बाजारभावापेक्षा किमान दोन ते तीन रुपये स्वस्तच मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासाच मिळत आहे.बदलापूर, शहापूर या भागातील हंगामी स्वरूपात नगदी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून गोगटे फळभाज्या खरेदी करतात. या भाज्या दोन ते तीन दिवस चांगल्या टिकतात. पालेभाज्या एका दिवसात कोमेजून जातात. त्या टिकवण्यासाठी शीतगृह नसल्याने फळबाज्याच आणत असल्याचे गोगटे म्हणाले. रात्रीत माल खरेदी करून तो दुसऱ्या दिवशी लगेच विकण्यात गोगटे यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे ग्राहकाला शेतीतील ताजी भाजी मिळते. शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांशी त्यांचे गणित जुळले आहे. काही शेतकरी गोगटे यांच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत आहेत. गोगटे यांच्या मागणीनुसार माल बाजारसमितीत पोहोचवला जातो. त्यानंतर गोगटे तेथून तो उलचून ग्राहकांपर्यंत पोहचवतात. त्यासाठी ते टोम्पो, त्यांचे कुटुंबीय आणि प्रशांत नेमाडे यांचा आधार घेतात. आठवड्यातून एक किंवा दोन दिवसाआड ते ३० ते ४० किलो माल आणतात. भविष्यात भाज्या निवडून, साफ करून देण्याचाही त्यांचा मानस आहे. तेसच अन्य ठिकाणीही स्वस्त भाजीपाला विक्रीची त्यांना शाखा सुरू करायची इच्छा आहे.