शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

मुस्लीम कुटुंबाने केले मंदिरासाठी भूदान!

By admin | Updated: June 18, 2014 04:59 IST

गोव्यातील एका मुस्लीम कुटुंबाने स्वमालकीची जमीन सिद्धिविनायक मंदिराला दान करून धार्मिक एकोप्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात २00४ साली एक आगळा आदर्श घालून दिला होता

सुशांत कुंकळयेकर, मडगावगोव्यातील एका मुस्लीम कुटुंबाने स्वमालकीची जमीन सिद्धिविनायक मंदिराला दान करून धार्मिक एकोप्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात २00४ साली एक आगळा आदर्श घालून दिला होता. कुंकळ्ळी या एका छोट्याशा गावातील शेख कुटुंबीयांच्या हृदयात या भूदानाबद्दल दातृत्वापेक्षा भक्तिभावच अधिक आहे.कुंकळ्ळी गाव पणजीपासून ५0 कि.मी. अंतरावर असून, पायराबांद येथे हे सिद्धिविनायक मंदिर आहे. सुरुवातीला हे मंदिर लहान होते. मात्र ज्या वेळी या मंदिराचा विस्तार हाती घेण्यात आला, त्या वेळी कुंकळ्ळी येथील शेख अब्दुल रेहमान यांच्या मालकीची जागा मंदिर समितीने मागितली. क्षणाचाही विलंब न करता रेहमान यांनी ही मागणी मान्य केली, असे मंदिर समितीचे माजी अध्यक्ष शिवदास नाईक यांनी सांगितले. कुंकळ्ळी गाव पूर्वापार धार्मिक सलोख्यासाठी प्रसिद्ध असून, पोर्तुगीज काळात बाटाबाटीच्या वेळी ख्रिस्ती झालेल्या या गावातील लोक अजूनही आपले मूळ विसरलेले नाहीत. यामुळेच गावाची देवी असलेल्या शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणच्या जत्रोत्सवाला हिंदंूप्रमाणेच ख्रिश्चनही मोठ्या प्रमाणात जातात. या देवीच्या छत्रोत्सवावेळी जी पालखी निघते त्या पालखीला खांदा देण्याचा मान येथील मूळ हिंदू; पण नंतर ख्रिस्ती झालेल्या बांधवांना आहे. गावातील ख्रिस्ती बांधव ‘देवीच्या मागणी’चा मोठ्या अभिमानाने उल्लेख करतात. वास्तविक हे शेख कुटुंब फारसे धनिक नाही. शेख अब्दुल रेहमान यांचा प्रवासी वाहने भाड्याने देण्याचा व्यवसाय होता. रेहमान यांनी जमीन मंदिरासाठी दान देण्याचे ठरविल्यानंतर त्याबाबत मुलांनाही सांगितले होते. त्यांच्या निधनानंतर मुलांनीही वडिलांच्या इच्छेला मान देऊन जमीन मंदिर समितीच्या हवाली केली.रेहमान यांची पत्नी आएशाबी, मुले शेख शरफुद्दिन, शेख अन्वर व शेख अब्दुल रजाक यांनी त्यांच्या मालकीची २00 चौ. मी. जमीन रेहमान यांच्या स्मरणार्थ दान केल्याची नोंद मंदिरात आहे.