शिरवळ: पुण्याहून साताऱ्याकडे भरधाव जाणाऱ्या दूध टॅकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टॅकर विरूरद्ध लेनला जाऊन चार ते पाच वाहनांना भीषण धडक दिली. यामध्ये दोनजण जागीच ठार झाले तर पाचजण गंभीर जखमी झाले. हा अपघात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिंदेवाडी येथे झाला. हा अपघात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास झाला आहे.
भरधाव दूध टॅकरची चार वाहनांना धडक, दोन ठार; पाच जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 20:57 IST