शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
4
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
5
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
6
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
7
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
8
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
9
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
10
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
11
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
14
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
15
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
16
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
17
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
18
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
19
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
20
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक संयुक्त आघाडी करून लढणार- प्रफुल्ल पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 01:00 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकी विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात दाखल जनहित याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर या क्षेत्राची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकी विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात दाखल जनहितयाचिका न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर या क्षेत्राची निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणूक जाहीर झाल्यास ही निवडणूक काँग्रेस राष्टÑवादी काँग्रेस संयुक्त आघाडी करुन लढणार असल्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.खा. पटेल म्हणाले, भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राची जागा पूर्वीपासूनच राष्टÑवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे त्यात बदलहोण्याचा प्रश्न नाही. तसेच निवडणूक आयोगाने येथील निवडणूकजाहीर केल्यास ती दोन्ही पक्ष आघाडी करुन लढवतील. मात्र यावर आत्तापासूनच तर्क विर्तक लावण्याची गरज नाही. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राची पोटनिवडणूक झाल्यास आपण स्वत: ती लढविणार नाही हे आपण आधीच स्पष्ट केले आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्ष उमेदवार ठरवेल. अद्यापही कोणत्याही उमेदवाराचे नाव निश्चित झाले नसल्याचे सांगितले.मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होवू घातल्या आहे. या तिन्ही ठिकाणच्या निवडणुका राष्टÑवादी काँग्रेस लढविणार आहे. या ठिकाणीराष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार उभेकेले जाणार असून त्यादृष्टीने पक्षाचे काम सुरू आहे, असेही पटेल म्हणाले. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत समाजवादीपाटी आणि बहुजन समाजपार्टीने एकत्र येऊन लढल्याने भाजपाच्या उमेदवाराचा दारुनपराभव झाला. त्यामुळे हाचप्रयोग २०१९ च्या निवडणुकीत केल्यास चित्र वेगळ असू शकते. त्यादृष्टीने सर्व विरोधकांमध्ये वातावरण तयार होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेल