शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

भांबोरा : मुलीचा विनयभंग करणा-यांची घरे संतप्त गावक-यांनी पेटवली

By admin | Updated: July 30, 2016 14:17 IST

अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील भांबोरा येथे शुक्रवारी मुलीची छेड काढण्यात आल्याच्या घटनेचे गावात संतप्त पडसाद उमटले असून गावक-यांनी आरोपींच्या घरावर हल्ला चढवला घरे पेटवली

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. ३० -  कर्जत तालुक्यात कोपर्डीपाठोपाठ भांबोरा येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी आता वातावरण आणखीच चिघळले आहे. संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी संशयित तरूणांसह पोलिसांना डांबून ठेवल्यानंतर शनिवारी पुन्हा ग्रामस्थांनी संशयितांच्या घरांना आग लावली, तसेच काही घरे पाडली. पालकमंत्र्यांनी तातडीने सकाळी गावात भेट देऊन ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले.
भांबोरा येथे शुक्रवारी नववीतील एका विद्यार्थिनीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र जागृत ग्रामस्थांमुळे या मुलीची सुखरूप सुटका झाली. नंतर ग्रामस्थांनी मुलीस पळवून नेणाऱ्या तरूणांसह तेथे आलेल्या पोलिसांनाही डांबून ठेवले. रात्री उशिरा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन तिघा पोलिसांना निलंबित केले. काही वेळ शांत झालेले हे वातावरण शनिवारी सकाळी पुन्हा चिघळले. ग्रामस्थांनी दुधोडी गावातील संशयित आरोपींच्या घरांना लाग लावली, तसेच काही घरे जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्थ केली. घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, माजी मंत्री सुरेश धस यांनी भांबोरा गावात भेट देऊन ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले. दरम्यान, गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.