शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर बेटिंग

By admin | Updated: October 23, 2014 09:09 IST

बुकींनी आता नवे मुख्यमंत्री कोण, यावर बेटिंग घेण्यास सुरुवात केली आहे. यात देवेंद्र फडणवीस हे पहिल्या क्रमांकावर असून त्यांचा दर ७२ पैसे आहे

डिप्पी वांकाणी, मुंबईबुकींनी आता नवे मुख्यमंत्री कोण, यावर बेटिंग घेण्यास सुरुवात केली आहे. यात देवेंद्र फडणवीस हे पहिल्या क्रमांकावर असून त्यांचा दर ७२ पैसे आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपा शिवसेनेचा पाठिंबा घेणार असल्याचेही बुकींनी घोषित केले आहे. या आठवड्याअखेरपर्यंत ८00 ते १000 कोटींचा धंदा होईल, अशी बुकींची अपेक्षा आहे.शिवसेना-भाजपा युती संपुष्टात आल्याने जोखीम लक्षात घेत आम्ही निवडणूक काळात बेटिंग घेतली नव्हती. पण आता निकाल उघड झाले आहेत. परिणामी राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण, याबाबतचा आमचा दर आम्ही जाहीर केला आहे, असे एका बड्या बुकीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे लोकप्रिय नाव असल्याचेही या बुकीने सांगितले. फडणवीस हे तरुण आणि तडफदार असून त्यांची प्रतिमाही चांगली आहे. त्यांच्यावर पक्षांतर्गतही कोणती टीका होत नाही. आमच्या अंदाजानुसार तेच मुख्यमंत्रिपदी येणार असल्याने आम्ही त्यांचा दर ७२ पैसे ठेवला आहे, असे या बुकीकडून सांगण्यात आले.नितीन गडकरी यांचेही नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असून त्यांचा दर ३ रुपये २५ पैसे आहे. दिल्लीहून राज्यातील राजकारणात येण्यास आपण उत्सुक नसून दिल्लीतच आनंदी असल्याचे गडकरी सांगत आहेत. शिवाय त्यांच्या कंपन्यांवर आयकर खात्याचे छापे पडले होते. त्यामुळे त्यांना हे पद मिळण्याची शक्यता कमी आहे, असे बुकीचे म्हणणे आहे.वर्षानुवर्षे युती असलेल्या शिवसेनेसोबतच भाजपा सत्तेवर येईल आणि राष्ट्रवादीने देऊ केलेल्या पाठिंब्याचा केवळ सेनेशी वाटाघाटी करण्यासाठीच वापर केला जाईल. यावेळी राज्यात उपमुख्यमंत्री नसेल तसेच भाजपा केंद्रात शिवसेनेला काही मंत्रिपदे देईल, असाही बुकींचा होरा आहे.