मुंबई : महापालिकेने सर्वच क्षेत्रांतील नागरी सेवा-सुविधांत दर्जेदार आणि उत्तम कामगिरी केली आहे. आरोग्य सेवेत तर यंदा डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यासारख्या आजारांना नियंत्रित करण्यासाठी केलेली कामगिरी ही वाखाणण्याजोगी आहे. पश्चिम उपनगरात विलेपार्ले (पूर्व) येथे निर्माण करण्यात येणारे डॉ. व्ही.एन. शिरोडकर प्रसूतिगृह हे राज्यात आदर्शवत ठरेल आणि अशी आणखी प्रसूतिगृहे महापालिका साकारेल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले. विलेपार्ले (पूर्व) येथील प्रभाग क्रमांक ७९ मधील सुभाष मार्ग स्थित डॉ. व्ही.एन. शिरोडकर प्रसूतिगृह इमारतीचे भूमिपूजन दीपक सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. शिरोडकर प्रसूतिगृहात नवजात अर्भक कक्ष निर्माण करणार असून १० बेड स्वत: पुरविणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
सर्वोत्तम प्रसूतिगृहे महापालिका निर्माण करणार
By admin | Updated: December 24, 2016 05:36 IST