शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

‘बेस्ट’चा संप सुरू, मुंबईकरांचे हाल अटळ, कर्मचारी प्रशासन बैठक निष्फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:56 IST

बेस्ट कामगारांच्या वेतनप्रश्नी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि बेस्ट कर्मचारी कृती समितीमध्ये महापौर निवास येथे रविवारी झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे बेस्टचे सुमारे ३६ हजार कामगार रविवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बेस्ट कामगारांच्या वेतनप्रश्नी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि बेस्ट कर्मचारी कृती समितीमध्ये महापौर निवास येथे रविवारी झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे बेस्टचे सुमारे ३६ हजार कामगार रविवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे वेतनप्रश्नी महापालिका आयुक्त अजय मेहता जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाहीत; तोपर्यंत बेस्ट कामगारांचा संप सुरूच राहणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. तर संपकऱ्यांवर ‘मेस्मा’अंतर्गत कारवाईचा इशारा बेस्ट प्रशासनाने दिला आहे.रविवारी रात्री उशिरा बेस्ट संपाबाबत महापौर बंगल्यावरील बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आयुक्त अजय मेहता आणि बेस्ट कर्मचारी कृती समितीचे नेते उपस्थित होते. मात्र रात्री उशिरा झालेल्या बैठकीतही संपावर काहीच तोडगा निघाला नाही. परिणामी सोमवारी संप होणार असल्याचे कामगार नेते शशांक राव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर सुरू असलेला बेस्ट उपक्रम कायमच तोट्यात आहे. महत्त्वाचे म्हणजे तोट्यातील बेस्ट मार्ग आणि कर्जाचा डोंगर असलेल्या बेस्टने यापूर्वीच महापालिकेकडे आर्थिक मदत मागितली आहे. परंतु महापालिकेनेही हात वर केल्याने बेस्ट कामगार संघटनांनी संपाचे हत्यार उपसले आहे. महापौर निवासस्थानी झालेल्या बैठकीदरम्यान विश्वनाथ महाडेश्वर यांनी बेस्ट कामगारांनी संपावर जाऊ नये, असे आवाहन केले आहे. परंतु बेस्ट कृती समितीने लेखी आश्वासनाचा आग्रह धरला आहे.‘बेस्ट’ला अनेक पर्यायसंपामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगर क्षेत्रात खासगी प्रवासी बससह स्कूल बस, कंपन्यांच्या बस आणि मालवाहक वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येईल. टॅक्सी व आॅटोरिक्षा संघटनांना जास्तीत जास्त वाहने रस्त्यावर उतरवण्यास सांगण्यात आले आहे. ‘एसटी’लाही सेवा पुरविण्यास सांगण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त एस. बी. सहस्रबुद्धे यांनी दिली.सणासुदीत प्रवाशांना फटकासोमवारी ऐन राखी पौर्णिमेच्या दिवशी हा संप होत असल्याने याचा फटका भावा-बहिणींना बसेल.बेस्ट कामगार हे पालिकेचे कामगार असल्याने त्यांची जबाबदारी महापालिकेने घ्यावी. मागण्यांबाबत लेखी आश्वासन आयुक्तांनी दिल्याशिवाय संप मागे घेणार नाही, असे बेस्ट कृती समितीने जाहीर केले आहे.कामगारांनी संपावर जाऊ नयेबेस्ट कामगारांनी संपावर जाऊ नये, अशी विनंती आम्ही केली आहे. मुंबईकरांवर संप लादला जाऊ नये. बेस्ट कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत. यासाठी अवधी लागेल.- विश्वनाथ महाडेश्वर, महापौर, मुंबई महापालिका१० आॅगस्टला पगारबेस्टच्या सर्व कामगारांनी सोमवारी कामावर रुजू व्हावे. जुलै महिन्याचे वेतन १० आॅगस्टला दिले जाईल. तोट्यातून बाहेर पडण्यासाठी उपाय सुरू आहेत.- सुरेंद्र बागडे, महाव्यवस्थापक, बेस्ट