शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चारसूत्री भात लागवडीचा प्रयोग आदिवासी भागात ठरला लाभदायी

By admin | Updated: October 24, 2016 08:36 IST

जलयुक्त शिवार अभियानातून अडविण्यात आलेल्या पाण्याने व शेततळ्यातून वासाळी, बारीशिंगवे येथील शेतकऱ्यांनी केलेला चारसुत्री हा नवीन भातशेतीचा प्रयोग लाभदायी ठरला

लक्ष्मण सोनवणे, ऑनलाइन लोकमत

बेलगाव कुऱ्हे ( नाशिक), दि. २४ -  भाताचे माहेरघर म्हणून परिचित असलेल्या इगतपुरी तालुक्यात हवामान बदलाचे मोठे आव्हान उभे राहिले असताना महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानातून अडविण्यात आलेल्या पाण्याने व शेततळ्यातून वासाळी, बारीशिंगवे येथील शेतकऱ्यांनी केलेला चारसुत्री हा नवीन भातशेतीचा प्रयोग लाभदायी ठरला आहे.आठवड्याभरात सोंगणीला वेग येणार असून भातशेतीतून उत्पादन देखील चांगले मिळणार असल्याने आदिवासी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बारीशिंगवे परिसरात भात कापणी सुरु झाली असून, मजूर खर्च परवडत नसल्यामुळे भात कापणी यंत्राच्या साहाय्याने येथील शेतकरी वसंत बोराडे, शिवाजी बोराडे, पांडुरंग बोराडे, गुलाब भले, कैलास भले, गोविंद लहांगे यांनी शेतात लागवड केलेली चारसुत्री भात कापणी सुरु केलेली आहे. मंडळ कृषी अधिकारी अरु ण पगारे, कृषी सहाय्यक रणजित आंधळे यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन लाभत आहे. मुबलक पाऊस परंतु खडकाळ जमिनीमुळे तालुक्यातील वासाळी येथे कायमच दुष्काळी परिस्थिती असते. अशात शेतकरी धास्तावले होते. गेल्या चार वर्षात पावसाचे स्वरूप, उपलब्ध पाणीसाठा यावर अवलंबून शेतीवर मोठा विपरीत परिणाम होताना दिसत होता. तालुक्यात नैसर्गिक बदलाच्या समस्या ‘आ’वासून उभ्या असताना शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या संयोगाने व शेततळे झाल्यामुळे पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना झाला. शेती संशोधन तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती होत असताना पावसावर अवलंबून असलेल्या भातशेतीसाठी दुष्काळी परिस्थितीमध्ये जलयुक्त शिवारातील सिमेंट काँक्रीट बंधारे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरले आहेत. भातशेतीला पर्यायी व्यवस्था निर्माण करून आधुनिक पीकपद्धती राबविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठे यश मिळाले आहे.