शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारात मंत्री असल्यामुळे मी कोणालाही भेटू शकतो - सदाभाऊ खोत

By admin | Updated: June 16, 2017 20:26 IST

सरकारात मंत्री म्हणून काम करत असताना कामानिमित्त मी कोणालाही भेटू शकतो. एकमेकांच्या गाठीभेटी घेणे, संबंध जपणे यामध्ये

ऑऩलाइन लोकमतइस्लामपूर, दि. 16 -  सरकारात मंत्री म्हणून काम करत असताना कामानिमित्त मी कोणालाही भेटू शकतो. एकमेकांच्या गाठीभेटी घेणे, संबंध जपणे यामध्ये वेगळे असे काही नसते. त्यामुळे आपल्याला जर वेळ असेल आणि बोलावणे आलेच तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरची भेट होणारच, असा पलटवार कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर शुक्रवारी केला.इस्लामपूर येथे सावकार कॉलनीतील निवासस्थानी खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक-खासदार राजू शेट्टी यांनी अमित शहा यांच्या भेटीबाबत ह्यआपल्या आदेशाशिवाय संघटनेचा प्रतिनिधी म्हणून कोणालाही भेटता येणार नाहीह्ण, असे वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर खोत बोलत होते.ते म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना खासदार शेट्टी यांनी केली आहे. ते संघटनेचे सर्वेसर्वा आहेत. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मी चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम करतो. खासदार शेट्टी यांनीच यापूर्वी अनेकवेळा संघटनेत अनेक कार्यकर्ते असून, त्यापैकीच सदाभाऊ एक असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मला कार्यकर्ता, विद्यार्थी म्हणून आयुष्यभर रहायला आवडेल. या संघटनेत मी त्यांचे नेतृत्व मानून काम केले आहे.अमित शहा यांच्या भेटीविषयी शेट्टींकडून आपल्याशी कसलीही चर्चा झालेली नाही. मंत्री म्हणून काम करत असताना कामानिमित्त भेटीगाठी होणे क्रमप्राप्त असते. माझ्यात कार्यकर्त्याचा गुण असल्यामुळे मानसन्मान न मागता मी भेटीगाठी घेतो. कार्यकर्त्याला लहान-मोठा असा भेदभाव नसतो. तो कार्यकर्ताच असतो, वेळ आली तर सतरंज्या उचलतो. जमिनीवर बसतो. त्याचे कुठल्या पत्रिकेत नाव असलेच पाहिजे असा आग्रह धरत नाही, असा उपरोधिक चिमटाही खासदार शेट्टी यांचे नाव न घेता खोत यांनी काढला.नेतेपण आले की मानसन्मान येतो. त्यामुळे मला कार्यकर्ता म्हणून राहण्यात स्वारस्य आहे. नेता म्हणून जगायचे नाही. सोमवारी मी मुंबईत असणार आहे. त्यामुळे मला वेळ असला की अमित शहा यांच्याबरोबरची भेट होणारच, असा पुनरुच्चारही खोत यांनी शेवटी केला.