शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
3
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
4
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
5
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
6
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
7
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
8
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
9
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
10
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
11
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
12
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
13
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
14
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
15
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
16
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
17
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
18
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
19
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
20
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जळगाव जिल्ह्यातील १७८ गावांना पाणी टंचाईच्या झळा

By admin | Updated: February 21, 2017 16:40 IST

फेब्रुवारी महिना उजाळल्यानंतर जिल्हाभरात पाणी टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यातील १७८ गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत असून त्यापैकी ६ गावांमध्ये तीन टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 21 : फेब्रुवारी महिना उजाळल्यानंतर जिल्हाभरात पाणी टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यातील १७८ गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत असून त्यापैकी ६ गावांमध्ये तीन टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी ७ कोटी ३५ लाखांचा आराखडा तयार केला आहे.गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांमध्ये जलसाठा समाधानकारक आहे. मात्र पाण्याचे होणारे बाष्पीभवन तसेच कृषी व अन्य क्षेत्रासाठी होणारा वापर यामुळे धरणक्षेत्रातील जलसाठा कमी होत असल्याने पाणी टंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे.१७८ गावांमध्ये पाणी टंचाईजिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखड्यात यावर्षी जिल्हाभरात ४४३ गावांमध्ये पाणी टंचाईची शक्यता वर्तविली आहे. त्यात आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या दरम्यान ६३ गावांमध्ये तर जानेवारी ते मार्च २०१७ या कालावधीत १७८ गावांमध्ये पाणी टंचाई जाणवणार आहे. तर एप्रिल ते जून २०१७ या कालावधीत २०२ गावांमध्ये पाणी टंचाई असणार आहे. सद्यस्थितीला अमळनेर तालुक्यात ४८, भडगाव ४, बोदवड १२, चाळीसगाव ९, चोपडा २५, धरणगाव २३, एरंडोल १६, जळगाव ३, जामनेर १२, मुक्ताईनगर ७, पारोळा १७, रावेर २ अशी गावनिहाय पाणी टंचाईची स्थिती राहणार आहे.७ कोटी ३५ लाखांची उपाययोजनाजिल्ह्यातील ४४३ गावांमधील संभाव्य पाणी टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ७ कोटी ३५ लाख ५ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्यात विहिर खोलीकरणासाठी १३ लाख १० हजार, शेवड्या घेण्यासाठी ३ लाख ६० हजार, खाजगी विहिर अधिग्रहणासाठी १ कोटी ११ लाख,  टँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी १ कोटी ७८ लाख,  नवीन विंधन विहिर तसेच कुपनलिका ताब्यात घेण्यासाठी एक कोटी ८१ लाख ३ हजार, नळ योजना दुरुस्त करण्यासाठी १ कोटी ८२ लाख, तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी ६५ लाख विंधन विहिर दुरुस्तीसाठी ५० हजार अशा उपाययोजनांचा समावेश आहे.६ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठाजानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत. सद्यस्थितीला ६ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जून महिन्यापर्यंत जिल्ह्यातील टँकरची संख्या ही ४३ पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.