शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या पार्किंगमधील बिअरबार सुरूच

By admin | Updated: June 9, 2016 01:01 IST

महापालिकेच्या मुख्य भवनाच्या आवारामधील पार्किंगमध्ये तळीरामांचा अड्डा सुरूच आहे.

पुणे : महापालिकेच्या मुख्य भवनाच्या आवारामधील पार्किंगमध्ये तळीरामांचा अड्डा सुरूच आहे. मुख्य इमारतीत रात्री सुरक्षेसाठी डझनभर सुरक्षारक्षक असतानाही या पार्किंगमध्ये दारूच्या बाटल्यांचा खच साठला असून या पार्किंगमध्ये राजरोसपणे दारू पार्ट्या रंगत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे महापालिका आयुक्तांची गाडी ज्या ठिकाणी पार्किंग केली जाते त्या आवारातच या पार्ट्या रंगत असून या बाटल्या उचलून महापालिकेचे स्वच्छता कर्मचारीही वैतागले आहेत. दरम्यान, या बुधवारी या पार्किंगमध्ये तब्बल ७० ते ८० बाटल्यांचा खच आढळून आला आहे. महापालिकेच्या पार्किंगमध्ये सुरू असलेल्या या रंगेल दारूपार्ट्यांची बाब दोन वर्षांपूर्वी ‘लोकमत’ने उजेडात आणली होती. त्याची गंभीर दखल घेत रात्री सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून जादा सुरक्षा तैनात करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकार काही प्रमाणात बंदही झालेले होते. मात्र, आता पुन्हा हे प्रकार सुरू झाले असून दररोज सकाळी या पार्किंगची सफाई करताना किमान डझनभर पाणी, सोडा तसेच दारूच्या बाटल्या सापडत आहेत. (प्रतिनिधी)>या इमारतीच्या सुरक्षेसाठी रात्री डझनभर सुरक्षारक्षक तैनात असतात. हे कर्मचारी रात्रभर गस्त घालून पालिकेचा काना कोपरा पिंजून काढत असल्याचा दावा करतात. मग पार्किंगमध्ये सुरू असलेल्या दारू पार्ट्या या कर्मचाऱ्यांना दिसत नाहीत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, या पार्ट्या या सुरक्षा रक्षकांच्या आशीर्वादानेच होत असून त्यात काही कर्मचारीही दारूवर ताव मारत असल्याचे काही कर्मचारी खासगीत बोलताना सांगतात.