शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिभाशाली कलावंताचे अपंग हात साकारताहेत सुंदर गणोशमूर्ती

By admin | Updated: August 4, 2014 23:19 IST

कोणतीही कला ही त्या कलाकाराच्या अंतरात्म्याच्या प्रतीभेचा आविष्कार असते. कलाकाराला कला व्यक्त करण्यासाठी आपल्या शारीरिक क्षमतांची गरज पडत असते.

बारामती : कोणतीही कला ही त्या कलाकाराच्या अंतरात्म्याच्या प्रतीभेचा आविष्कार असते. कलाकाराला कला व्यक्त करण्यासाठी आपल्या शारीरिक क्षमतांची गरज पडत असते. परंतु, कोणी जन्मजात जर अपंग असेल तर.. परंतु आपल्या कलेवर त्याची निस्मिम श्रद्धा असणा:या कलाकाराला आपण काय म्हणू.. एक तर त्याच्यावर खास विद्येची देवता सरस्वतीची कृपा असली पाहिजे किंवा अविरत कष्टांनी त्या कलाकाराने आपल्या कलेवर प्रभुत्व तरी मिळवले असले पाहिजे. 
असाच एक अपंग कलाकार बारामती तालुक्यातील गुणवडी गावात राहतो. मनोज कुंभार हे त्यांचे नाव. मनोज यांच्या घरामध्ये परंपरागत गणोशमूर्ती बनविण्याचा व्यवसाय आहे. जन्मताच  हाताला बोटे नसताना कोणत्याही साच्याचा वापर न करता मनोज यांना सुंदर गणोश मूर्ती घडविताना पाहणो म्हणजे पाहणाराला एक विलक्षण अनुभवच असतो. 
 मनोज यांना हाताला बोटे नाहीत. परंतु, त्या अधू हातातून निर्माण होणारी एक एक कलाकृती हातीपायी धडधाकट असणा:या सामान्य माणसाला अचंबित केल्याशिवाय राहत नाही. 
भोर येथील विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये  कला शिक्षक असणा:या मनोज यांनी एटीडी, सीटीसी असे अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. तसेच, ‘मॉडर्न आर्ट’मध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे.  लहानपणापासूनच कलेची आवड असणा:या मनोज यांच्या घरात गणोशोत्सवादरम्यान गणोशमूर्ती बनवण्याचा व्यवसाय आहे. आपल्या या परंपरागत व्यवसायात आई आणि वडिलांच्या मदतीने मनोज विविध प्रकारच्या गणोशमूर्ती कोणत्याही साच्याचा उपयोग न करता ‘हातानेच’ बनवितात. गणोशमूर्ती बनविताना मातीवर लिलया फिरणारा त्यांचा अधू हात जेव्हा सुंदर गणोशमूर्ती घडवितो तेव्हा पाहणा:याला आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. यामधून इकोफ्रेंडली गणोशमूर्ती बनविल्याने पर्यावरणपूरक गणोशोत्सवास प्रधान्य मिळेल, असेही मनोज यांना वाटते.
 
4कला शिक्षक असणा:या मनोज कुंभार यांनी ‘मॉडर्न आर्ट’ या कलाप्रकारामध्ये विशेष प्रावीण्य मिळवले आहे. हाताला बोटे नसतानाही चित्रकलेच्या क्षेत्रमध्ये त्यांनी मिळवलेले हे यश परिसरामध्ये कौतुकाचा तर विषय आहेच, परंतु त्याहीपेक्षा परिसरात राहणा:या रहिवाशांसाठी तो एक अभिमानाचाही विषय आहे. आतार्पयत अनेक सामाजिक संस्थांनी मनोज यांना विविध पुरस्कारांनी गौरविले आहे. औरंगाबाद येथील कलाभारती संस्थेचा 2क्क्4 चा कलारत्न, मनोबल बालविकास प्रतिष्ठानचा 2क्क्4 चा कलाभूषण पुरस्कार त्यांना आतार्पयत प्राप्त झाले आहेत. 
 
4विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आजर्पयत मनोज यांनी पर्यावरण पुरक (इकोफ्रेंडली) गणोशमूर्तीसाठी कार्यशाळा घेतल्या आहेत. या वेळी मनोज यांनी बोलताना सांगितले, की विविध खासगी शाळांमध्ये सातत्याने पर्यावरण पुरक उपक्रम राबविले जातात. मात्र, त्यामानाने जिल्हा परिषद शाळांमध्ये असे उपक्रम होताना दिसत नाहीत. त्यासाठी मी स्वत: पुढाकार घेऊन असे उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे. माङया या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसादही मिळतो, त्यामुळे गणोशोत्सव जास्तीत जास्त पर्यावरणपूरक कसा होईल आणि आपण त्याचा निखळ आनंद कसा मिळवू, हे पाहिले पाहीजे. विद्याथ्र्यामध्ये पर्यावरणपूरक गणोशोत्सवाबद्दल जागृती आणि आवड निर्माण होण्यासाठी असे उपक्रम या दिवसांमध्ये राबविले जावेत, असेही मनोज यांनी या वेळी सांगितले.