शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
2
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
3
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
4
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
5
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
6
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
7
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
8
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
9
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
10
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
11
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
12
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
13
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
14
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
15
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
16
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका
17
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे
18
कर्नाटकात 'RSS'वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारण
19
नवरी जोमात, नवरा कोमात! एक, दोन नव्हे तर लग्नानंतर १२ नववधू झाल्या फरार, नेमकं काय घडलं?
20
UPI युजर्ससाठी नवं फीचर; मँडेटही पोर्ट करता येणार, दुसऱ्या अॅप्सचे ट्रान्झॅक्शन्सही दिसणार, काय आहे नवी सुविधा?

सैनिक हो तुमच्यासाठी, एक सैनिक एक पणती

By admin | Updated: November 5, 2016 03:27 IST

शहीद भारतीय जवानांसाठी एक सैनिक एक पणती या द्वारे कृतज्ञतेच्या भावनेतून श्रद्धांजली अर्पण करून नागरिकांनी देशभक्तीचा प्रत्यय दिला

डहाणू/बोर्डी : शहीद भारतीय जवानांसाठी एक सैनिक एक पणती या द्वारे कृतज्ञतेच्या भावनेतून श्रद्धांजली अर्पण करून नागरिकांनी देशभक्तीचा प्रत्यय दिला. दिवाळी सणाच्या निमित्ताने बोर्डी, चिखले आणि घोलवड गावातील नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी एकित्रत येऊन सामुहिकरीत्या सैनिकांसाठी दीपावलीचा एक दिवा समर्पित केला. देशाच्या सुरक्षेसाठी घरावर तुळशीपत्र ठेवणाऱ्या आणि प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवाळिनिमित्त विविध गावांमध्ये कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. २९ आॅक्टोबर रोजी बोर्डी गावातील चाफवाडी मंडळ आणि लक्ष्य फाउंडेशनने प्रत्येक सैनिक एक पणती हा कार्यक्र म घेतला. या वेळी बोर्डी परिसरातील कै. रामचंद्र यांच्या पत्नी सुनंदा आडगा यांना, तर विपुल सावे, सुनील सावे, किसन मांगेला, विजय कोल आदि. निवृत्त सैनिकांना आमंत्रित केले होते. दीप प्रज्वलनासह कारगील युद्धात परमवीर चक्र विजेत्यांची माहिती तसेच कविता उपस्थितांना ऐकविण्यात आली. ३० आॅक्टोबरच्या सायंकाळी सहा वाजता चिखले गावात महात्मा गांधी तंटामुक्त समितीने एक ग्रामस्थ एक पणती सैनिकांना समिर्पत करून सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी रिठी ते वडकती या गावातील प्रमुख रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थांनी दीप प्रज्वलीत केले. देशभक्तीपर घोषणा आणि समर गीतांनी परिसर दुमदुमला होता. या मध्ये शाळकरी विद्यार्थी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. (वार्ताहर)>जवानांना श्रद्धांजलीरविवार सायंकाळी सात वाजता घोलवड ग्रामस्थांनी शिवाजी मैदानात एकित्रत येऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी निवृत सैनिक राम राऊत, विजय कोल आणि निवृत्त कोसगार्ड अधिकारी भरत मेस्त्री उपस्थित होते. दरम्यान, देशाचे पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला डहाणू तालुक्यातील विविध गावांमधून भरभरून प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.