शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेतेच राहा!

By admin | Updated: May 9, 2014 01:24 IST

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपा नेते विनोद तावडे यांची गुरुवारी फेरनिवड करण्यात आली.

मुंबई : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपा नेते विनोद तावडे यांची गुरुवारी फेरनिवड करण्यात आली. आपण सहा वर्षे या पदावर राहा, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तावडे यांना देत पाच महिन्यांनी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत आघाडीचीच सत्ता येणार असल्याचा एकप्रकारे चिमटा काढला. एक चहावाला पंतप्रधान होऊ घातला आहे, पुढे काय काय होते ते पाहा, असा टोला तावडे यांनी लगावला. तावडे यांच्या फेरनिवडीची घोषणा सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केली. तावडे यांचे अभिनंदन करताना हास्यविनोद, राजकीय शेरेबाजी तर झालीच, शिवाय लोकसभा निवडणुकीच्या संभाव्य निकालांवरून एकमेकांना सुनावण्याची संधी दोन्ही बाजूंनी सोडली नाही. महाविद्यालयीन जीवनापासून सक्रिय असलेले तावडे अभ्यासू नेते आहेत. सामान्यांच्या प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे. अपार मेहनत हा त्यांचा गुणविशेष आहे, असे कौतुक सभापती शिवाजीराव देशमुख, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. तावडे सभागृहात जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. सभागृहाचे नेते अजित पवार यांनी मात्र माणसे जोडण्याचे कसब असलेले तावडे उत्तम वक्ते असून, इव्हेंट मॅनेजमेंट त्यांना बरोबर जमते, असे सांगितले. दुष्काळग्रस्त भागात त्यांनी मोटरसायकलवरून दौरा केला. मोटरसायकलवरून जातानाच ते चॅनलवाल्यांना मुलाखती देत होते. नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे या भाजपाच्या दोन्ही नेत्यांना ते जवळचे वाटतात, अशी फिरकी घेतली. १६ मे नंतर राजकीय समीकरणे तशीच राहतील, याचा अंदाज आल्यानेच तावडेंनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारले, असेही ते म्हणाले. आपले पद किती काळासाठी आहे ते पुढे ठरेल, पण मिळालेल्या पदाचा वापर आपण सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी करू, असे तावडे म्हणाले. सांसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील, शिवसेनेचे गटनेते दिवाकर रावते यांनीही भावना व्यक्त केल्या. सभागृहाचे कामकाज सुरू होताच मुख्यमंत्री चव्हाण यांनी शिवाजीराव देशमुख, विनोद तावडे, भाऊसाहेब फुंडकर, हेमंत टकले, किरण पावसकर, चंद्रकांत रघुवंशी, नीलम गोºहे, हरिभाऊ राठोड आणि आनंद ठाकूर या नव्या सदस्यांचा परिचय करून दिला. (विशेष प्रतिनिधी)