शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीचे माजी अध्यक्ष बी.बी. शिंदे यांचे निधन

By admin | Updated: September 4, 2016 22:27 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) माजी अध्यक्ष, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ भिकन बापूराव ऊर्फ बी.बी. शिंदे (७९) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 4 - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) माजी अध्यक्ष, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ भिकन बापूराव ऊर्फ बी.बी. शिंदे (७९) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, २ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. बोरगाव सारवनी (ता. सिल्लोड) या मूळ गावी सोमवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य तसेच बीड येथील बलभीम महाविद्यालयाचे प्रदीर्घ काळ प्राचार्य राहिलेले बी.बी. शिंदे हे गणिताचे रँगलर म्हणून ओळखले जात. कडक शिस्तीचे म्हणून ख्याती असणाऱ्या शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी गणित या विषयातह्यपी.एचडी. मिळविली. गेवराई येथील अट्टल महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी १९७०-७१ या वर्षी काम बघितले. त्यानंतर १९७१ ते १९७९ या कालावधीत त्यांनी बलभीम महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी कार्य केले.

१९९० ते २००२ या १२ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी एमपीएससीचे सदस्य आणि अध्यक्ष म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांनी ६ वर्षे एमपीएससीचे अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कार्य केले. महाराष्ट्र शासनाच्या तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध समित्यांवर त्यांनी प्रदीर्घ काळ काम केले. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे त्यांनी १२ वर्षे सदस्यत्व भूषविले. यापैकी ६ वर्षे ते राज्यपाल नियुक्त सदस्य होते.