शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

पतंगाची दोरी ठरतेय मुलांसाठी जीवघेणी...!

By admin | Updated: November 7, 2014 23:33 IST

साताऱ्यातील चित्र : किरकोळ अपघातात वाढ.पालकांनी--मुलांनी ही काळजी घ्या--अपघात झाल्यास

सातारा : दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या पतंगोत्सवामुळे आकाशात विविध रंग आणि आकारातील पतंग पाहून मन हरकून जाते; पण जावे त्यांच्या वंशा म्हणतात त्याप्रमाणे या नेत्रसुखद पतंगांचा आविष्कार कोणासाठी अत्यंत धोकादायक ठरत असल्याचे दिसत आहे.सध्या अनेक ठिकाणी दुपारच्यावेळी मोठ्या प्रमाणावर पतंग उडविणारे मुलांचे दर्शन घडते. कोणी घराच्या गच्चीवर, बांधकामांवर तर कोणी अपार्टमेंटच्या टेरेसवर पतंगबाजीचा आनंद घेतात. पतंग उडविण्यात मुलं इतकी मग्न असतात की, काहीदा त्यांना धोक्याचीही जाणीव उरत नाही. कित्येकदा टेरेसवरून खाली पडून जखमी झालेल्या मुलांना कायमचे अपंगत्वही आल्याचे पाहायला मिळते.पतंग उडविण्याचा आनंद मुलींपेक्षा मुलं अधिक घेतात. सुटीचा दिवस हा त्यासाठी राखीव असतो. खेळण्यात मग्न असणाऱ्या या मुलांना कुठल्याही परिस्थितीत कोणाचाही हस्तक्षेप नको असतो. म्हणून घरातून कोणीही कितीही ओरडून सांगितले तरीही त्याकडे दुर्लक्ष करत ही मुलं पतंगबाजीचा आनंद घेतात; पण सगळ्यांनाच पतंग उडविण्याचा उत्साह असल्यामुळे कोणीही सुरक्षिततेची काळजी घेण्याची तमा करत नाही. यामुळे होणारे अपघात आयुष्यभर मनामध्ये घर करून राहतात.सुटीच्या दिवशी मुलांची पतंगबाजी सर्वाधिक सुरू असते. पतंग उडविण्यासाठी मुलं बोगदा परिसरातही जात असल्याचे दिसते. रस्त्यावर पतंगबाजी सुरू असल्यामुळे वाहनचालकांच्या गळ्याभोवती मांजा अडकणे, पतंग पकडताना मुलं अचानक गाडीसमोर येणे, असे काही प्रकार घडतात. (प्रतिनिधी)सुटी असल्यामुळे आम्ही कासला फिरायला आलो होतो. बोगद्याकडून कासकडे जाताना असणाऱ्या एका वळणावर दहा वर्षांचा एक मुलगा पतंग पकडण्याच्या नादात अचानक गाडीसमोर पळत आला. काही कळायच्या आतच समोर मुलगा आल्याने मी जोरात ब्रेक दाबला. यामुळे गाडीतील लोक परस्परांच्या अंगावर आदळले. त्यात माझ्या सासूला डोळ्याला इजा झाली. त्यामुळे त्यांना तातडीने दवाखान्यात न्यावे लागले. पर्यटनाचा पूर्ण दिवस दवाखान्यात गेला.- परेश ओसवाल, पर्यटकपालकांनी--मुलांनी  ही काळजी घ्यापतंगबाजी करताना मुलांवर लक्ष ठेवामुलं कितीही मोठे असले तरीही त्याच्याबरोबर घरातील मोठी व्यक्ती आवश्य ठेवामुलांना सुरक्षित ठिकाणी पतंग उडवायला घेऊन जाशक्यतो मोकळ्या मैदानावर पतंंगबाजी करू द्यापतंग काटाकाटीमागे मुलांना पळू देऊ नकामुलांनी ही काळजी घ्याउंचावर चढून पतंगबाजी करण्याचा मोह टाळाएकाच वेळी सगळ्यांनी पतंगबाजी करू नकापतंगबाजी करताना हुल्लडबाजी टाळाकाटलेल्या पतंगाच्या मागे पळताना वाहनांकडेही लक्ष द्याकितीही मोह झाला तरीही उंचावर अडकलेल्या पतंग काढण्याचा प्रयत्न करू नकाअपघात झाल्यास काय कराल?संबंधित मुलाच्या पालकांना तातडीने याची माहिती द्याजखम किरकोळ दिसत असली तरीही वैद्यकीय सल्ला घ्याअपघातग्रस्ताचे घर लांब असेल किंवा घरात कोणी नसेल तर शेजारच्यांच्या मदतीने प्रथमोपचार करापालक ओरडण्याची भीती वाटत असली तरीही पालकांना याविषयी माहिती द्यापतंग उडवायला लांब जाणार असाल, तर सोबत प्रथमोपचारचे कीट सोबत ठेवा.