शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

‘बार्टी’त जाहिरातीविनाच पदभरती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 05:11 IST

सावळा गोंधळ : माजी मंत्री बडोले यांच्या पीएच्या बंधूची वर्णी

धनाजी कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेत (बार्टी) गेल्या काही महिन्यांपासून सावळा गोंधळ सुरु आहे. कधी प्रसूती रजा, तर कधी समतादूत प्रकल्पावरून चर्चेत राहणाऱ्या बार्टीने कोणतीही जाहिरात, परीक्षा, मुलाखत अशी प्रक्रिया न करता पदभरती केल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात एका कर्मचाºयानेच तक्रार केली असून, माहितीच्या अधिकारात तपशील मागितला आहे. त्यातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

एका महिला कर्मचाºयाने याबाबत महासंचालक आणि निबंधक यादव गायकवाड यांच्याकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारीत म्हटले आहे की, बार्टीने तब्बल ११ अधिकाऱ्यांची पदभरती केली आहे. तसेच काही जवळच्या लोकांना पदोन्नती दिली आहे.

यात भीमराव पारखे, नरेंद्र पटेल, पद्मश्री पाटील, सुभाष परदेशी, प्रमोदिनी नाईक, आरती जाधव, नसरीन तांबोळी, दत्ता शेटे, जी. जी. निकम, पंकज माने, लालासाहेब जाधव यांचा समावेश आहे. यातील पंकज माने हे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे पीए रवींद्र माने यांचे बंधू असून, त्यांना प्रकल्प संचालक म्हणून घेतले आहे. पारखे हे महासंचालक कणसे यांच्या जवळचे असून, निवृत्त अधिकारी आहेत. त्यांना प्रकल्प संचालक हे पद दिले आहे.

सरकारी अधिकाºयांना नोकरीत घेऊ शकतोबार्टी ही स्वायत्त संस्था असल्याने जाहिरातीची आवश्यकता नाही. निवृत्त सरकारी अधिकाºयांना आम्ही थेट नोकरीत घेऊ शकतो. तक्रार अर्ज मिळाला आहे. त्यानुसार चौकशी करून निर्णय घेतला जाईल. कुणावर पात्र असताना अन्याय झाला असेल, तर त्याचाही विचार केला जाईल.- कैलास कणसे, महासंचालक, बार्टी