शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

अळ्यांनी विकसित केली बी. टी. मधील प्रथिनांविरूद्ध प्रतिकारशक्ती

By admin | Updated: September 21, 2016 17:35 IST

कपाशीवर बोंड अळी हल्ला करू शकणार नाही, या दृष्टीने संशोधकांनी बी. टी. कपाशीचे नवीन वाण तयार केले होते.

विवेक चांदूरकरबुलडाणा, दि. २१ : कपाशीवर बोंड अळी हल्ला करू शकणार नाही, या दृष्टीने संशोधकांनी बी. टी. कपाशीचे  नवीन वाण तयार केले होते. मात्र, यामध्ये असलेल्या क्राय वन एसी या प्रथिनांविरूद्ध गुलाबी बोंड अळीने आपली प्रतिकार विकसित केली असून, आता बी. टी. कपाशीवरही या किडींनी हल्ला चढविला असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील संशोधकांच्या निदर्शनास आले आहे.

कपाशीवर किडींचे आक्रमण होवू नये याकरिता क्राय वन एसी हे प्रथिने बियाण्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यामुळे बी. टी. कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव जाणवत नव्हता. मात्र, यावर्षीपासून कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. किडींचे आक्रमण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहे.  तसेच संशोधकांनी बी. टी. मध्ये क्राय २ एबी हे प्रथिन समाविष्ट करून आणखी सुधारीत वाण विकसित केले.  मात्र, गुलाबी बोंड अळीमधील प्रतिकारशक्ती आता या वाणाविरूद्धही विकसित होत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे कृषि तंत्र विद्यालय, बुलडाणाचे प्राचार्य डॉ. गिरीश जेऊघाले यांनी सांगितले.

वऱ्हाडात बीटी कपाशीला मान्यता मिळाल्यानंतर दरवर्षी फार मोठ्या प्रमाणावर बीटी कपाशीची लागवड होत आहे. त्यामुळे बोंडअळ्यांच्या व्यवस्थापनाकरीता होणाऱ्या कीटकनाशकांच्या फवारण्यामध्ये लक्षणीय घट झाली. परंतु बीटी कपाशी लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी शिफारशीय पद्धतीने न वापरल्यामुळे प्रामुख्याने गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव बीटी कपाशीवर आढळून येत आहे. यावर्षी ही कीड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतावर आढळून येत आहे. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचा बीटी कपाशीवरील प्रादुर्भाव थांबविणे आवश्यक झाले आहे. शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त फुले (डोमकळी) ओळखून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय अंमलात आणले तर गुलाबी बोंडअळीच्या पुढच्या पीढीस अटकाव करुन होणारे संभाव्य नुकसान टाळू शकतात.

या बोंडअळीची वाढ साधारणत: उष्ण व ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस असल्यास झपाट्याने होते. या बोंडअळीचा प्रादुर्भाव हिरव्या बोंडामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. एकदा का अळी बोंडामध्ये शिरली की बोंडावरील छीद्रबंद होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रा. जेऊघाले यांनी सांगितले.