शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

बारामती नगरपालिकेला तब्बल सव्वा कोटीचा दंड

By admin | Updated: April 8, 2017 01:42 IST

पाणी साठवण तलावात नीरा डावा कालव्यातून पाणी घेताना ‘इलेक्ट्रॉनिक वॉटर मीटर’ न बसवल्याचा चांगलाच झटका नगरपालिकेला बसला आहे.

बारामती : नगरपालिकेच्या नवीन पाणी साठवण तलावात नीरा डावा कालव्यातून पाणी घेताना ‘इलेक्ट्रॉनिक वॉटर मीटर’ न बसवल्याचा चांगलाच झटका नगरपालिकेला बसला आहे. जलसंपदा (पाटबंधारे) खात्याने औद्योगिक दराप्रमाणे तब्बल १ कोटी २४ लाख २२ हजार ४१६ रुपये पाणीपट्टीची दंडासह आकारणी केली आहे. जलसंपदा विभागाने वारंवार नोटिसा देऊनही या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे थेट दंडासह औद्योगिक दराप्रमाणे आकारणी केल्याचे बिल मिळाल्यावर नगरपालिका प्रशासनाची पळापळ झाली. आता दंडासह आकारलेले बिल माफ करावे, अशी मागणी पालिकेने कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. नगरपालिकेने सुरुवातील १२७ दशलक्ष लिटर क्षमतेचा कॉँक्रिटचा साठवण तलाव बांधला. त्यानंतर पूर्वीचे मातीच्या तलावांच्या जागेवरच ३२५ दशलक्ष लिटर क्षमतेचा मोठा साठवण तलाव बांधण्यात आला आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी या तलावाचे काम झाले. त्यापूर्वीदेखील पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी काम थांबवून नीरा डावा कालव्याचे पाणी तलावात घेण्यात आले होते. मात्र, त्यासाठी ‘इलेक्ट्रॉनिक वॉटर मीटर’चा वापर करावा लागतो. मीटरशिवाय पाणी घेता येत नाही. पाटबंधारे खात्याकडून नगरपालिकेला ३ रुपये १५ पैसेप्रमाणे प्रति दहा हजार लिटर पाण्याला दरआकारणी केली जाते. नवीन साठवण तलावाचे काम सुरू असतानाच एप्रिल २०१६ पासून पाणी घेण्यास सुरुवात केली. याबाबत पाटबंधारे खात्याला न कळवताच पाणी घेणे सुरू केल्याची तक्रार येथील अ‍ॅड. नितीन भामे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, हा प्रकार उघड झाल्यानंतर जलसंपदा विभागाच्या मानकानुसार नगरपालिकेने वॉटर मीटर बसवला आहे, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर नगरपालिकेला ज्या दराने पाणी दिले जाते, त्या प्रमाणात पालिकेने पाणीपट्टी भरली आहे. दंडात्मक आकारणीची रक्कम माफ करावी, असे पत्र जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबत बारामती पाटबंधारे विभागाचे उपअभियंता आप्पासाहेब भोसले यांनी सांगितले, की शाखा अभियंत्यामार्फत नगरपालिकेला पाणीपट्टी आकारणीची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानुसार चालू आकारणीचे बिल भरण्यात आले आहे. यावर भाजपाचे नितीन भामे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तर विरोधी पक्ष नेते सुनील सस्ते यांनीदेखील प्रशासनाला याबाबत विचारणा केली. तर साठवण तलावात पाणी घेण्यास सुरुवात झाली तेव्हाच जलसंपदा विभागाला कळवणे आवश्यक होते. परंतु पालिकेने जलसंपदा खात्याची परवानगी न घेताच पाणी घेणे सुरू केले. त्याचा परिणाम वितरिकांचे सिंचन विस्कळीत होत असल्याचे लेखी पत्र शाखाधिकारी चौलंग यांनी दिले होते. या संदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी सांगितले, की याबाबत जलसंपदा खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. केलेला दंड माफ करण्याची मागणी पालिकेने केली आहे. हा प्रश्न मिटेल. मीटर बसवण्याची पूर्तता केली आहे.नवीन साठवण तलावात पाणी घेत असताना पाण्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वॉटर मीटर बसवून घेण्यात यावे, अन्यथा नगरपालिकेच्या पाणीपट्टीची आकारणी १२५ टक्के करण्यात येईल, असेही सूचित केले. तरीदेखील तब्बल वर्षभर या पद्धतीने पाणी घेतल्याने १ कोटी २४ लाखांहून अधिक दंडासह पाणीपट्टी आकारणी केली़जलसंपदा विभागाने अनेकदा पत्रव्यवहार करून इलेक्ट्रॉनिक वॉटर मीटर बसवण्यात आला नव्हता. जवळपास सव्वा कोटी रुपयांची दंडात्मक पाणीपट्टी आकारणी केल्यावर नगरपालिका प्रशासनाची तारांबळ उडाली. रीतसर परवानगी घेऊन मीटरने पाणी घेतले असते, तर ३ रुपये १५ पैसेप्रमाणे फक्त १२ लाख ४८ हजार ४७१ पाणीपट्टी आकारणी उचललेल्या पाण्यासाठी झाली असती. तब्बल सव्वा कोटी रुपयांचा दंंड आकारला आहे़