शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
8
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
9
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
10
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
11
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
12
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
13
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
14
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
15
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
16
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
17
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
18
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
19
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
20
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल

‘विशेष’ मूर्तिकार साकारतायत बाप्पा!

By admin | Updated: August 23, 2016 01:41 IST

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय.

महेश चेमटे,

मुंबई- गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय. गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरविण्याचे काम मूर्तीशाळांमध्ये सुरू असतानाच, मुंबईतील महालक्ष्मी येथे ‘विशेष’ मूर्तिकारांनी बनविलेल्या शाडूच्या मातीचा बाप्पा रूपाला येत आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या विळख्यात सापडलेल्या घरगुती मूर्तींना शाडूच्या मातीतून श्वास देण्याचा प्रयत्न हे ‘विशेष मूर्तिकार’ करीत असतात.‘विशेष’ विद्यार्थ्यांना आर्थिक स्थैर्य आणि सक्षमीकरणासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. समाजाच्या मुख्य प्रवाहातून दूर असलेल्या समाजातील ‘विशेष’ विद्यार्थ्यांसाठी’ ओम क्रिएशन संस्था गेली २५ वर्षांपासून कार्यरत आहे. ‘विशेष’ विद्यार्थ्यांना घेऊन अगरबत्ती स्टँडपासून सुरुवात करणाऱ्या हातांनी गेल्या सात वर्षांपासून बुद्धिदेवता अर्थात, गणपती मूर्ती साकारण्यास सुरुवात केली आहे.आजमितीला हे मूर्तिकार ९ ते २४ इंच उंची असलेल्या विविधरूपी गणेशमूर्ती साकारतात, तसेच मूर्तीच्या आभूषणांना नैसर्गिक रंगांनी रंगरंगोटीदेखील करतात. ट्रस्टमध्ये २२ ते ४५ वयोगटांतील विशेष मुले आहेत. या कार्यशाळेत विशेष विद्यार्थ्यांच्या हाताने यंदा ५६ ‘विशेष’ मूर्तिकारांनी तब्बल ७० गणेशमूर्ती साकारत आहेत. या मूर्तींची विक्री करून मिळणारे पैसे त्या मुलांना मोबदला म्हणून देण्यात येतो. या मोबदल्याुमळे अनेकांनी घर चालवल्याचे उदाहरणे आहेत. त्याचबरोबर, रिकाम्या काचेच्या बाटल्यांपासून दिवे, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविण्यात ही मुले पारंगत आहेत. गणपती म्हणजे काय? यापासून ते मूर्तीचे वैशिष्ट्ये, आभूषणे का आहेत? या सर्वांचे उत्तर त्यांना समजावून सांगितले जाते. अनेकदा शहरातील मूर्ती कारखान्यांना भेट देऊन वेगवेगळ््या मूर्ती त्यांना दाखविल्या जात असल्याची माहिती ट्रस्टचे समन्वयक अर्चना मेहता यांनी दिली.>मूर्तिकारांची निरागसता समाधान देणारीमूर्ती बनवताना त्यांची निरागसता मूर्तीतून प्रकट होते. त्यामुळे आपण जेव्हा मूर्ती घेतो, त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप समाधान देऊन जातो. पर्यावरण संवर्धन करणाऱ्या शाडूच्या मूर्ती घरोघरी जाणीवपूर्वक स्थापन केली पाहिजे. यामुळे प्रदूषणाला आळा बसतो. - डॉ. संध्या कामत, माजी अधिष्ठाता, केईएम रुग्णालय