शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

बाप्पा मोरया रे

By admin | Updated: September 13, 2015 05:05 IST

गणेशोत्सवाचे आजचे स्वरूप खूपच वेगळे आहे; परंतु पूर्वीच्या गणेशोत्सवामध्ये एक निराळा आनंद होता. वेगळेपण होते. सांस्कृतिक संदर्भ आणि भक्कम आधारही होते.

- रमेश सहस्रबुद्धेगणेशोत्सवाचे आजचे स्वरूप खूपच वेगळे आहे; परंतु पूर्वीच्या गणेशोत्सवामध्ये एक निराळा आनंद होता. वेगळेपण होते. सांस्कृतिक संदर्भ आणि भक्कम आधारही होते. गणेशोत्सवातील प्रथा-परंपरांच्या बदलत गेलेल्या प्रवासाकडे टाकलेला दृष्टिक्षेप...भारतीय परंपरेनुसार कोणत्याही शुभकार्याप्रसंगी प्रथम गणपतीचे पूजन करतात, असे का? याबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. ‘गण’ म्हणजे अष्टवसूंचा समूह. ‘वसू’ म्हणे दिशा. गणपती म्हणजे अष्टदिशांचा स्वामी. इतर देवता गणेशाच्या परवानगीशिवाय कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत; म्हणूनच कोणत्याही देवतेची पूजा अथवा मंगलकार्य करताना प्रथम गणेशपूजन करतात. गणपतीने एकदा का दिशा मोकळ्या केल्या, की ज्या देवतेची आपण पूजा करीत असतो, ती तेथे येऊ शकते. यालाच महागणपती पूजन असे म्हणतात. जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणाऱ्या विस्फुटित लहरींचा समूह म्हणजे गण आणि त्याचे निमंत्रण करणारा तो गणपती. विनाशकारक व तमप्रधान अशा तीनशे साठ यमलहरी विविध दिशांतून अव्याहतपणे प्रवास करत असतात; परंतु गणेशचतुर्थी ते अनंतचतुर्दशीपर्यंत गणेश लहरी पृथ्वीवर जास्त प्रमाणात येत असल्याने यमलहरींची तीव्रता कमी होते. यासाठीच गणपतीची या काळात आराधना केली जाते.इसवी सन १९३०-४०च्या दरम्यान पुण्यात सार्वजनिक गणपतीपुढे पुढाऱ्यांची व्याख्याने होत. पट्टीचे वक्ते व्याख्यानासाठी गायकवाडवाड्यात हजेरी लावून जात. वक्त्यांच्या अनुचित विधानानंतर वादळेही माजत. व्याख्यानांव्यतिरिक्त या काळी नामवंत गायकांच्या गायनाचे कार्यक्रम आणि काव्यगायनेही गणपतीसमोर होत; तरीही गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असे ते मेळ्यांचे. अशा मेळ्यांची एकूण संख्या त्या काळी पन्नास-साठ असावी. प्रामुख्याने सारस्वत व ब्राह्मणांची वस्ती असलेल्या मुंबईतील शांताराम चाळीच्या गणेशोत्सवास १८९४मध्ये प्रारंभ झाल्याचे जुन्या कागदपत्रांवरून आढळते. हा गणेशोत्सव १८९७पर्यंत साजरा झाला. त्यानंतर १८९८ ते १९००पर्यंत उत्सव बंद पडला. प्रथम दुष्काळ, त्यानंतर प्लेग, मग ब्रिटिशांची दडपशाही, टिळकांना झालेली कारावासाची शिक्षा, यामुळे तेथील गणेशोत्सव बंद पडला असावा. शांताराम चाळीचा गणेशोत्सव बंद पडणे, लोकमान्य टिळकांना रुचले नाही. अखेर चाळीतील रहिवाशांची सभा होऊन हा उत्सव पुन्हा सुरू करण्याचे ठरले. कै. विष्णुपंत राशिनकर यांनी उत्सवास पहिली वर्गणी दिली. मग १६ सप्टेंबर १९०१ रोजी लोकमान्य टिळकांनी स्वहस्ते शांतारामच्या चाळीत श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सवास धीराने उभे केले. सन १९०१पासून आजतागायत हा गणेशोत्सव सुरू आहे. या चाळीतील गणेशोत्सवाचा शतक महोत्सवी सोहळा १ ते १२ सप्टेंबर २००० या काळात साजरा झाला होता.कायमस्वरूपी मूर्ती बनविण्याचा काळ...कायमस्वरूपी गणेशमूर्ती फक्त गणेशोत्सवाच्या काळात ठेवण्यात येऊ लागल्या. पूजेसाठी मात्र, छोट्या मूर्ती असून, त्या बोलविल्या जात. मात्र, या मोठ्या कायमस्वरूपी मूर्ती बोलविल्या जात नसत. पुण्यातील खडकावरील खेडकरांचा लाकडी गणपती, हत्ती गणपती, ही त्याची उदाहरणे होत. आजही अनेक गणेशोत्सव मंडळांच्या मोेठ्या मूर्ती या कायमस्वरूपी असतात.गणेशाची विडंबनरूपे...दुसऱ्या महायुद्धापासून गणेशमूर्तीची विडंबनरूपे करण्यात येऊ लागली. गणपतीच्या मूर्तींना ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांची रूपे देण्यात आली. त्यानंतर सामाजिक चित्रपटांच्या दृश्यातही गणेशमूर्ती आकार घेऊ लागल्या. ‘आवारा’ चित्रपटातील राज कपूर, नर्गिसच्या प्रणयदृश्यातील गणेशमूर्ती, राजकमलच्या ‘रामजोशी’तील सवाल-जबाबच्या दृश्यातील गणेशमूर्ती, तसेच पुढारी, पोस्टमन, शेतकरी आणि सध्या बालचमूंमध्ये प्रसिद्ध असलेल्या बाहुबली रूपातील गणेशमूर्तीपण दिसू लागल्या. शिवाजी महाराज, सुभाष बाबू, जवाहरलाल नेहरू ही मंडळी; पण गणेशरूपात दिसू लागली. त्यामुळे भाविकभक्तांच्या भावना दुखावू लागल्याने गणेशमूर्तींची विडंबनरूपातील प्रदर्शनेबंद झाली.