शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

बापलेकीने भरदिवसा काढला काटा, नीरा-नृसिंहपूर हादरले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:32 IST

बलात्काराचा गुन्हा दाखल असणाºया आरोपीचा, त्या गुन्ह्यात फिर्यादीच्या बापाने कोयत्याच्या चार घावांतच मुडदा पाडला. या हत्याप्रकरणात फिर्यादी मुलगीही सहभागी होती. गुरुवारी (दि. १०) दुपारी तीनच्या सुमारास नीरा-नृसिंहपूर गावातील चौकात हा प्रकार घडला. या प्रकारात मृत तरुणाचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. हा गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत.

इंदापूर : बलात्काराचा गुन्हा दाखल असणाºया आरोपीचा, त्या गुन्ह्यात फिर्यादीच्या बापाने कोयत्याच्या चार घावांतच मुडदा पाडला. या हत्याप्रकरणात फिर्यादी मुलगीही सहभागी होती. गुरुवारी (दि. १०) दुपारी तीनच्या सुमारास नीरा-नृसिंहपूर गावातील चौकात हा प्रकार घडला. या प्रकारात मृत तरुणाचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. हा गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत.नीलेश नागनाथ घळके (वय १७, रा. नीरा-नृसिंहपूर, ता. इंदापूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मृत नीलेशची आई सुनीता नागनाथ घळके (रा. नीरा-नृसिंहपूर) हिने इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.सविस्तर हकीकत अशी, फिर्यादी सुनीता घळके व आरोपी हे एकमेकांचे नातलग असून शेजारी रहातात. पीडित मुलीने दि. १० एप्रिल २०१७ रोजी नीलेश नागनाथ घळके व श्रीकांत पोपट घळके (रा. गणेशगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या दोघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात बलात्कार केल्याची तक्रार दिली होती. यावरून गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात श्रीकांत घळके याला अटक करण्यात आली होती. तर, मृत नीलेश अल्पवयीन असल्याने त्याला त्या वेळी पुण्यातील बालन्यायालयात हजर करण्यात आले होते. तेथेच त्याचा जामीन झाला होता. यामुळे बाप-लेक त्याच्यावर चिडून होते. फिर्यादीच्या घरी येऊन ते सतत ‘न्यायालयाने त्याला सोडले असले तरी मी सोडणार नाही,’ अशी धमकी देत होते. घाबरलेल्या घळके कुटुंबीयांनी नीलेश याला इंदापूर येथील होस्टेलवर ठेवले होते. तो घरी येत नव्हता. इंदापुरातच शिक्षण घेत होता.नीलेशची परीक्षा संपल्याने तो आज दुपारी ३ वाजता घरी आला. हातपाय धुण्यासाठी तो आत गेला होता. आई-वडील घरात बसले होते. एवढ्यात हातात कोयते घेऊन आरोपी व त्याची मुलगी हे दोघे जण घरात घुसले.नीलेशचे वडील नागनाथ श्यामराव घळके यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांच्या हातावर व कपाळाच्या डाव्या बाजूला कोयत्याने वार केले. पीडित मुलीने फिर्यादी सुनीता घळके यांच्या छातीवरवार केला.क्रूरपणाने केले वार, परिसरात खळबळ1 काहीतरी अघटित घडते आहे, याची कल्पना येताच नीलेश हा घरालगत असणाºया दुकानाच्या शटरमधून मागच्या बाजूने पळून गावच्या चौकाकडे गेला.आरोपी त्याच्या पाठलागावरच होते. आई सुनीता व त्याचे वडील त्याच्या पाठोपाठ पळाले. आरोपीने नीलेशला चौकात गाठून कोयत्याने त्याच्यावर वार केले.2 नीलेशच्या डाव्या व उजव्या हातावर, गालावर व गळ्यावर वार करण्यात आले होते. झालेले घाव एवढे घातक होते, की त्याच्या डाव्या हाताचा पंजा हातावेगळा होऊन बाजूला पडला होता. चारच घावात त्याचा जागीच मृत्यू झाला. नीलेशचा खून करून आरोपी तेथून निघून गेला. पीडित मुलगी मात्र तिथेच थांबली होती.3 नीलेशची आई घटनास्थळावर आल्यानंतर ‘या वेळी तू वाचली आहेस; पण तुझ्या घरादाराला सोडणार नाही,’अशी धमकी देऊन ती तेथून निघून गेली. याचा उल्लेखदेखील फिर्यादीत करण्यात आला आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने नीरा-नृसिंहपूर चौकात खळबळ उडाली.